TRENDING:

Tata Sierra ला थेट भिडणार, 'ती' धाकड SUV कमी किंमतीत लाँच, मार्केटमध्ये आलं तुफान!

Last Updated:
भारतात एकेकाळी रस्त्यावर राज्य करणारी एसयूव्ही म्हणून तिची ओळख होती, दमदार इंजिन, आतामध्ये भरपूर जागा, मायलेजही उत्तम अशी ही फ्रान्सची कार उत्पादक कंपनी Renault ने आपली  लोकप्रिय Duster पुन्हा एकदा भारतात आणली आहे.
advertisement
1/7
Tata Sierra ला थेट भिडणार, 'ती' धाकड SUV कमी किंमतीत लाँच, मार्केटमध्ये आलं तुफान!
भारतात एकेकाळी रस्त्यावर राज्य करणारी एसयूव्ही म्हणून तिची ओळख होती, दमदार इंजिन, आतामध्ये भरपूर जागा, मायलेजही उत्तम अशी ही फ्रान्सची कार उत्पादक कंपनी Renault ने आपली  लोकप्रिय Duster पुन्हा एकदा भारतात आणली आहे. यावेळी नवीन लूक, दमदार इंजिन आणि फिचर्ससह आली आहे. विशेष म्हणजे, भारतात सध्या एसयूव्ही मार्केटमधील स्पर्धा पाहता किंमतही कमीच ठेवली आहे. त्यामुळे Renault Duster  आता थेट टाटा मोटर्सच्या सियारा आणि हुंदुईच्या क्रेटाला टक्कर देणार आहे. 
advertisement
2/7
Renault Duster मागील महिन्यातच लाँच करण्यात आली होती. मागील काही दिवसांपासून कंपनीने Renault Duster  ची किंमत गुलदस्त्यात ठेवली होती.अखेरीस कंपनीने Renault Duster  ची किंमत जाहीर केली असून सुरुवाती किंमत फक्त १०.२९ लाखांपासून सुरू होती. याच ठिकाणी टाटा मोटर्सच्या सियाराची किंमत ११.४९ लाखांपासून सुरू होते. त्यामुळे इथं फाईट आता चांगलीच तगडी आहे.  तर टॉप एन्ड मॉडेलची किंमत ही १८ लाखांपर्यंत आहे.  
advertisement
3/7
Renault Duster मध्ये २ टर्बो पेट्रोल इंजिन दिले आहे, पहिलं हे १.० लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे  जे १०० बीएचपी पॉवर  आणि १६०Nm टॉर्क जनरेट करते. यामध्ये ६ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स दिला आहे.
advertisement
4/7
तर दुसरं मॉडेल हे १.३ लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे.   यामध्ये १६३ बीएपी पॉवर आणि २८० एनएम इतका टॉर्क जनरेट होतो. ही सुद्धा ६-स्पीड मॅन्युअल किंवा ६-स्पीड ड्युअल क्लच ऑटोमॅटिक दिलं आहे. एवढंच नाहीतर Renault Duster ही हायब्रिड व्हर्जनमध्येही येणार आहे. ती दिवाळीच्या दरम्यान लाँच होईल. 
advertisement
5/7
Renault Duster च्या फिचर्सबद्दल बोलायचं झालं तर  LED हेडलॅम्पस दिले आहे, आयब्रो शेप्ड DRLs मुळे नवी लूक मिळाला आहे. समोरच्या बाजूला लोगोऐवजी 'Duster' असं नाव लिहिलं आहे.  रग्ड बॉडी क्लॅडिंग, १८-इंच ब्लॅक अलॉय व्हील्स आणि २१२mm चे ग्राउंड क्लिअरन्स दिला आहे. 
advertisement
6/7
Renault Duster च्या इंटिरियरमध्ये १०.१-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिलं आहे,  वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले सपोर्ट, १०.२५-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, वायरलेस फोन चार्जर, पॅनोरॅमिक सनरुफ आणि ३६० डिग्री कॅमेरा असे फिचर्स दिले आहे.
advertisement
7/7
सुरक्षेसाठी TPMS, फ्रंट आणि रिअर पार्किंग सेन्सर्स आणि लेव्हल-२ ADAS सिसिस्टीम दिली आहे. या एसयूव्हीची प्री बुकिंग २१ हजारांपासून सुरू झाली आहे. आता किंमत जाहीर झाल्यामुळे डस्टर पहिल्या सारखं मार्केट गाजवणार का हे पाहण्याचं ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Tata Sierra ला थेट भिडणार, 'ती' धाकड SUV कमी किंमतीत लाँच, मार्केटमध्ये आलं तुफान!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल