Royal Enfield ची लुनासारखी 'बुलेट' पाहून लोकांना बसला शॉक, PHOTOS व्हायरल
- Published by:sachin Salve
Last Updated:
दणकट आणि दमदार अशी बुलेट तयार करणारी रॉयल एनफील्ड आता आपली पहिली वहिली ईलेक्ट्रिक बाइक घेऊन येत आहे. पण ही बाइक बुलेटपेक्षा खूप वेगळी आहे.
advertisement
1/8

दणकट आणि दमदार अशी बुलेट तयार करणारी रॉयल एनफील्ड आता आपली पहिली वहिली ईलेक्ट्रिक बाइक घेऊन येत आहे. पण ही बाइक बुलेटपेक्षा खूप वेगळी आहे. जर तुम्ही ही बाइक पाहिली तर विश्वास बसणार नाही की ही रॉयल एनफील्डची बाइक आहे. पण ही बाइक जरा वेगळी आहे. जरी ही दिसायला बारीक असेल तरीही आधुनिक आहे. या बाइकचं नाव आहे C6. नुकतंच या बाइकचं टेस्टिंग सुरू झालं आहे. दिल्लीच्या रस्त्यावर पाहण्यात आलं आहे.
advertisement
2/8
रॉयल एनफिल्डने Flying Flea C6 नावाची आपली पहिली इलेक्ट्रिक बाइक अलीकडे लाँच केली होती. ही बाईक ब्रिटिश आर्मीच्या ऐतिहासिक Flying Flea मॉडेल डोळ्यासमोर ठेवून तयार केली आहे. शहरात आरामदायक प्रवास व्हावा या उद्देशाने ही बाइक तयार केली आहे. पण वजनदार बुलेट पाहण्याची सवय असलेल्या भारतीयांना ही बाइक पाहून मात्र आश्चर्याचा धक्का बसले. ( फोटो साभार - Gaadiwaad. डॉट.कॉम)
advertisement
3/8
रॉयल एनफील्ड Flying Flea C6 ची रचना दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश सैन्याने वापरलेल्या मोटरसायकलपासून प्रेरित आहे. त्याची बनावट फ्रेम हलकी आणि मजबूत असण्यासाठी डिझाइन केलेली आहे, तर मॅग्नेशियम बॅटरी वजन कमी करण्यासाठी आणि चांगले कुलिंग देण्यासाठी डिझाइन केलेली आहे.
advertisement
4/8
बाईकच्या पुढील आणि मागील बाजूस बॅटरी फिन देण्यात आले आहेत, जे केवळ ती सुंदर बनवत नाहीत तर हवेचा प्रवाह देखील सुधारतात. गोल हेडलॅम्प आणि सिंगल सीट याला रेट्रो क्लासिक लूक देतात. पिलियन सीट अॅक्सेसरी म्हणून उपलब्ध असेल, ज्यामुळे रायडर त्यांच्या गरजेनुसार ते कस्टमाइझ करू शकेल.
advertisement
5/8
रॉयल एनफील्ड फ्लाइंग Flying Flea C6ची सर्वात अनोखी गोष्ट म्हणजे... त्याचे गर्डर फोर्क सस्पेंशन हे इतर इलेक्ट्रिक बाइक्सपेक्षा वेगळे बनवते. हलकी पण मजबूत फ्रेम, जी बाईकचे वजन कमी ठेवते आणि हाताळणी सुधारते. याशिवाय, त्यात गर्डर फोर्क सस्पेंशन आहे, जे शहराच्या वाहतूक कोंडीत आणि खराब रस्त्यांमध्येही चांगली साथ देते. यात मॅग्नेशियम बॅटरी केस देखील आहे, जे वजन कमी करते आणि बॅटरी कूल ठेवण्यास मदत करते.
advertisement
6/8
रॉयल एनफिल्डने त्यांच्या पहिल्या इलेक्ट्रिक बाइक Flying Flea C6 ची संपूर्ण बॅटरी आणि मोटर स्पेसिफिकेशन उघड केलेली नाही. पण बाइकमध्ये अनेक चांगले फिचर्स दिले आहे. इन-हाऊस विकसित व्हेईकल कंट्रोल युनिट (VCU) दिलं आहे ते बाईकच्या थ्रॉटल, ब्रेक आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंगला ऑप्टिमाइझ करेल आणि उत्कृष्ट रायडिंग अनुभव प्रदान करेल.
advertisement
7/8
स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, स्नॅपड्रॅगन QWM2290 चिपसेट - हे कनेक्टेड सर्व्हिसेस टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल, ज्यामुळे रायडर्सना रायडिंग अनुभव मिळेल. कॉर्नरिंग एबीएस, क्रूझ कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल, एलईडी लाइटिंग आणि डिजिटल डिस्प्ले दिला आहे.
advertisement
8/8
रॉयल एनफिल्डने अद्याप फ्लाइंग फ्ली सी६ ची लाँचिंग तारीख आणि किंमत जाहीर केलेली नाही. परंतु, २०२५ च्या अखेरीस ते भारतात लाँच होईल. या बाइकची किंमत सुमारे ३.५ लाख ते ४.५ लाख रुपये (एक्स-शोरूम) असण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Royal Enfield ची लुनासारखी 'बुलेट' पाहून लोकांना बसला शॉक, PHOTOS व्हायरल