TRENDING:

Tata Sierra: 34 वर्षांपूर्वी भारतात आली होती पहिली SUV, किंमत वाचून बसेल धक्का, आता टाटा आणतेय 'ती'ला परत!

Last Updated:
भारतात सर्वात पहिली लाँच झालेल्या एसयूव्हीचं नाव आहे  टाटा सियारा.  भारतातील पहिली एसयूव्ही टाटा मोटर्सची होती.  ३४ वर्षांपूर्वी म्हणजे १९९१ मध्ये टाटा सियारा लाँच झाली होती.
advertisement
1/10
34 वर्षांपूर्वी भारतातली पहिली SUV, किंमत होती फारच कमी, आता sierra  येतेय परत!
सध्या भारतीय ऑटो इंडस्ट्रीमध्ये एकापेक्षा एक कार आणि एसयूव्हींनी मार्केट व्यापलं आहे. सध्या कारच्या किंमतीत एसयूव्ही येत असल्यामुळे लोकांचा कल हा एसयूव्ही खरेदीकडे वळला आहे. पण याआधी भारतीय मार्केटमध्ये हीच जागा सेडान आणि हॅचबॅक कारने घेतला होता. पण आता स्वस्तात मस्त आणि मजबूत अशा एसयूव्हींनी जागा घेतली आहे. पण भारतात सर्वात आधी एसयूव्ही आणली होती टाटाने.
advertisement
2/10
भारतात सर्वात पहिली लाँच झालेल्या एसयूव्हीचं नाव आहे  टाटा सियारा.  भारतातील पहिली एसयूव्ही टाटा मोटर्सची होती.  ३४ वर्षांपूर्वी म्हणजे १९९१ मध्ये टाटा सियारा लाँच झाली होती. लाँचच्या वेळी ही एसयूव्ही पूर्णपणे वेगळी होती. भारतात त्यावेळी अशी एसयूव्ही आलीच नव्हती. तेव्हा एसयूव्हीची संपूर्ण  कन्सेप्ट भारतात नवीन होती.
advertisement
3/10
पहिल्या एसयूव्हीची किंमत किती होती? - १९९१ मध्ये लाँचच्या वेळी टाटा सियाराची किंमत  ५ लाख रुपये होती. आज ही किंमत कमी वाटत असली तर तेव्हा सियाराची किंमत ही एखाद्या लक्झरी कार इतकीच होती.  १९९१ मध्ये जेव्हा सियारा लाँच झाली तेव्हा कारच्या किंमती १ लाखांपासून सुरू होत होत्या. त्यात टाटा सियाराची किंमतीही ५ लाख होती, त्यामुळे त्या काळातील सर्वात महागड्या कारपैकी एक मानली जात होती.
advertisement
4/10
पण, आता २५ नोव्हेंबर २०२५ रोजी टाटा सियारा नवीन रंगात आणि ढगात लाँच होत आहे.  ही कार २५ नोव्हेंबर रोजी टाटा मोटर्सकडून भारतात अधिकृतपणे लाँच होत आहे.
advertisement
5/10
सियाराचे फिचर्स?- मुळात त्यावेळी टाटा सियारा ही डिझाईन आणि टेक्नालॉजीच्या बाबतीत खूप वेगळी होती.  त्यावेळी बाजारात असलेल्या जीप एकतर परदेशी डिझाइनच्या होत्या किंवा प्रामुख्याने भारतीय लोकांच्या वापर लक्षात ठेवून गाड्या डिझाइन केल्या गेल्या होत्या. पण टाटा सियारा काळाच्या एक पाऊल पुढे होती.
advertisement
6/10
टाटा सियारामध्ये पॉवर विंडो आणि अॅडजस्टेबल स्टीअरिंग व्हील सारखे फिचर्स देणारी एकमेव गाडी होती. या गाडीत फॅक्टरी-फिटेड एअर कंडिशनिंग (AC) देखील होता. शक्तिशाली आणि ऑफ-रोड क्षमता असलेली ही ३-डोअर एसयूव्ही होती, ज्यामध्ये मोठी मागील काचेची खिडकी (ज्याला अल्पाइन विंडो म्हणतात) ही त्याची अनोखी ओळख होती.
advertisement
7/10
टाटा सियारा ही बॉडी-ऑन-फ्रेमवर बांधली गेली होती, ज्यामुळे ती खूप मजबूत आणि खडकाळ भूभागासाठी योग्य होती. त्यात ४×४ (फोर-व्हील ड्राइव्ह) प्रकाराचा पर्याय देखील होता, ज्यामुळे ती एक उत्कृष्ट ऑफ-रोडिंग एसयूव्ही बनली.
advertisement
8/10
टाटा सियाराचं इंजिन कसं होतं?  सुरुवातीला टाटा सियारामध्ये २.०-लिटर डिझेल इंजिनसह आली. नंतर, कंपनीने १९९७ मध्ये टर्बोचार्ज केलेले डिझेल इंजिन (२.०-लिटर, ८७ बीएचपी) सादर केलं, ज्यामुळे तिची कार्यक्षमता आणखी वाढली. १९९१ मध्ये जेव्हा सियारा लाँच झाली तेव्हा तिची किंमत सुमारे ५ लाखांपासून सुरू झाली होती.
advertisement
9/10
त्यावेळी मारुती ८०० सारख्या लोकप्रिय कार १ लाख ते १.५ लाख मध्ये उपलब्ध होती. त्या तुलनेत, सियारा एक प्रीमियम आणि महागडी ऑफर होती.
advertisement
10/10
तिच्या उच्च किंमतीमुळे आणि ३-दरवाज्यांच्या डिझाइनमुळे, तिची विक्री अपेक्षेइतकी यशस्वी झाली नाही आणि २००३ मध्ये उत्पादन बंद करण्यात आलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Tata Sierra: 34 वर्षांपूर्वी भारतात आली होती पहिली SUV, किंमत वाचून बसेल धक्का, आता टाटा आणतेय 'ती'ला परत!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल