TRENDING:

बुलेटपेक्षाही 'ही' कार महाराष्ट्रात मिळेल स्वस्त, मुंबईतून पुण्याला जा फक्त 0.50 किमी खर्चाने!

Last Updated:
महाराष्ट्रात महायुती सरकारच्या ईलेक्ट्रिक वाहन धोरणामुळे सोलर आणि ईलेक्ट्रिकवर चालणारी एक कार तुम्हाला एखाद्या रॉयल एनफिल्डच्या बाइकपेक्षाही स्वस्त मिळेल.
advertisement
1/6
बुलेटपेक्षाही 'ही' कार महाराष्ट्रात मिळेल स्वस्त,मुंबई-पुणे फिरा खर्च 0.50 किमी
वाढते इंधनाचे दर आणि प्रदुषणामुळे सर्वत्र आता ईव्ही कार घेण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. हेच लक्षात घेऊन महायुती सरकारने राज्यामध्ये ईलेक्ट्रिक वाहन धोरण मंजूर केलं आहे. महायुती सरकारच्या या धोरणामुळे राज्यात ईलेक्ट्रिक कारच्या किंमतीत १५ टक्क्यांनी कपात झाली आहे. एवढंच नाहीतर टोल सुद्धा माफ असणार आहे. अलीकडेच सोलर आणि ईलेक्ट्रिकवर चालणारी एक कार मार्केटमध्ये लाँच झाली. ही कार तुम्हाला आता महाराष्ट्रात एखाद्या रॉयल एनफिल्डच्या बाइकपेक्षाही स्वस्त मिळेल.
advertisement
2/6
जानेवारी महिन्यात झालेल्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025मध्ये वेव्ह मोबिलिटी (Vayve Mobility) ही पुण्यातली स्टार्टअप कंपनी इव्हा या आपल्या सौर ऊर्जेवरच्या कारचं अपग्रेडेड व्हर्जनदेखील या एक्स्पोमध्ये सादर केलं होतं. ही भारतातली सौर ऊर्जेवरची पहिली कार आहे. ही कार ईव्ही सुद्धा आहे.
advertisement
3/6
Vayve इलेक्ट्रिक आणि सोलर कारची किंमत 3.25 लाख रुपये (एक्स शोरूम) इतकी आहे. ही कार तीन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. 3.25 लाखांमध्ये ही कार जेव्हा विकत घेता येईल जेव्हा तुम्ही या कंपनीसोबत रेंटल करार कराल. जर बॅटरी सह ही कार विकत घ्यायची असेल तर 5.99 लाख (एक्स शोरूम) इतकी किंमत होईल.
advertisement
4/6
ही कार कंपनीने मेट्रो सिटीज डोळ्यांसमोर ठेवून डिझाइन केली आहे. तिला कमी जागा पुरत असल्याने मोठ्या ट्रॅफिकमध्येही ती चालवणं सहज शक्य आहे. तसंच, तिचं पार्किंगही कमी जागेत करणं शक्य होईल.
advertisement
5/6
ही कार 50 पैसे खर्चात एक किलोमीटर अंतर जाऊ शकते. तसंच, पाच सेकंदांमध्ये ही कार 0 ते 40 किलोमीटर्सचा वेग प्राप्त करू शकते. या कारचा कमाल वेग ताशी 70 किलोमीटर्स आहे. या कारची रनिंग कॉस्ट कमी असून, ही कार स्मार्टफोनला अगदी सहजपणे जोडता येते.
advertisement
6/6
ही इलेक्ट्रिक कार पूर्ण चार्ज केल्यावर २५० किमी इतका रेंज देऊ शकते. तर सोलर एनर्जीसह चालवली तर एका वर्षामध्ये ही कार 3000 किमी चालवू शकतात. Vayve Mobility ने दावा केला आहे की, सोलर पावर्ड इलेक्ट्रिक कार फक्त 0.50 पैसे प्रति किलोमीटर इतका खर्चावर ही कार धावेल. फक्त 0.50 पैसे एका किलोमिटर चालवण्याचा खर्च येईल. त्यामुळे ही भारतातील सर्वात स्वस्त अशी कार ठरली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
बुलेटपेक्षाही 'ही' कार महाराष्ट्रात मिळेल स्वस्त, मुंबईतून पुण्याला जा फक्त 0.50 किमी खर्चाने!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल