Bike Oil : बाईकचं ऑइल कधी बदलायचं? गाडीने दिलेले हे संकेत कधीही दुर्लक्षित करु नका
- Published by:Devika Shinde
Last Updated:
अनेकांना अजूनही हे माहीत नसतं की ऑइल किती दिवसांनी किंवा कोणत्या परिस्थितीत बदलायचं. त्यामुळे बाईकचं इंजिन खराब होतं आणि त्याचा खर्चही जास्त येतो. चला तर मग जाणून घेऊया हे ऑइल बदलण्याची योग्य वेळ कधी असते.
advertisement
1/8

आपल्यापैकी प्रत्येकाची एखादी आवडती बाईक किंवा स्कूटर असते. रोजच्या प्रवासात, ऑफिसला जाण्यासाठी किंवा विकेंडला छोट्या ट्रिपसाठी ही बाईक आपल्याला साथ देते. पण बाईकचं इंजिन निरोगी ठेवायचं असेल, तर त्यातलं इंजिन ऑइल योग्य वेळेवर बदलणं खूप महत्त्वाचं आहे. अनेकांना अजूनही हे माहीत नसतं की ऑइल किती दिवसांनी किंवा कोणत्या परिस्थितीत बदलायचं. त्यामुळे बाईकचं इंजिन खराब होतं आणि त्याचा खर्चही जास्त येतो. चला तर मग जाणून घेऊया हे ऑइल बदलण्याची योग्य वेळ कधी असते.
advertisement
2/8
1. इंडिकेशन लाइटआजकाल जवळजवळ सगळ्या बाइक्समध्ये सेन्सर बसवलेले असतात. त्यामुळे इंजिन ऑइल कमी झालं की बाईक तुम्हाला डॅशबोर्डवरून इंडिकेशन देते. हे दिसताच त्वरित ऑइल बदला. दुर्लक्ष केल्यास इंजिन खराब होऊ शकतं.
advertisement
3/8
2. इंजिनचा आवाजबाईक चालवताना अचानक इंजिन जास्त आवाज करायला लागतंय का? तर हे एक स्पष्ट लक्षण आहे की ऑइल बदलायची वेळ आली आहे. जुनं आणि वापरलेलं ऑइल इंजिनचं संरक्षण कमी करतं.
advertisement
4/8
3. काळा धूरकधी कधी सायलेंसरमधून काळा धूर निघतो. हेही इंजिन ऑइल जुने झाल्याचं संकेत असतं.
advertisement
5/8
4. ऑइलचा रंगताजं ऑइल तपकिरी रंगाचं असतं. पण जसजसं ते जुने होतं, तसतसं काळं आणि घट्ट होतं. थोडं ऑइल बोटावर घेऊन तपासलं तरी ते लक्षात येतं.
advertisement
6/8
5. ऑइल लेव्हलप्रत्येक बाईकमध्ये इंजिनाशेजारी एक छोटी खिडकी असते. त्यातून ऑइलची पातळी पाहता येते. जर पातळी कमी वाटली तर लगेच नवीन ऑइल घालणं आवश्यक आहे.
advertisement
7/8
थोडक्यात सांगायचं तर, बाईकचं इंजिन निरोगी आणि टिकाऊ ठेवायचं असेल तर इंजिन ऑइलची वेळेवर काळजी घ्या. ही छोटीशी सवय तुमच्या लाडक्या बाईकचं आयुष्य वाढवेल.
advertisement
8/8
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Bike Oil : बाईकचं ऑइल कधी बदलायचं? गाडीने दिलेले हे संकेत कधीही दुर्लक्षित करु नका