Bike : बाईकच्या मागची सीट उंच का असते? स्टाइल नाही यामागे असं कारण, ऐकून म्हणाल 'अरे हे मला आधी का नाही कळलं'
- Published by:Devika Shinde
Last Updated:
सर्व बाईक्समध्ये एक गोष्ट तुम्ही नेहमी पाहिली असेल, ती म्हणजे मागची सीट (Pillion Seat) जी पुढच्या सीटपेक्षा नेहमीच थोडी उंच असते. पण कधी विचार केला का की ही सीट अशी वर किंवा उंच का असते?
advertisement
1/7

स्पोर्ट्स बाईक (Sports Bike) असोत किंवा साधी कम्युटर बाईक. पण या सर्व बाईक्समध्ये एक गोष्ट तुम्ही नेहमी पाहिली असेल, ती म्हणजे मागची सीट (Pillion Seat) जी पुढच्या सीटपेक्षा नेहमीच थोडी उंच असते. पण कधी विचार केला का की ही सीट अशी वर किंवा उंच का असते?
advertisement
2/7
ही उंच सीट पाहून अनेक लोक तक्रार करतात की, त्यांना किंवा त्यांच्या मागे बसणाऱ्या व्यक्तीला बसताना किंवा उतरताना अडचण येते. अनेक लोक विचार करतात की हे फक्त स्टाईलसाठी डिझान केलेलं असेल, पण असं नाही, ही उंच सीट तुमच्या सुरक्षिततेसाठी आणि चांगल्या रायडिंग अनुभवासाठी तयार करतात. चला जाणून घेऊया, बाईकच्या मागच्या सीटच्या उंचीमागे लपलेली खास कारणे.
advertisement
3/7
उंच सीट डिझाईनमागे लपलेली खास 3 कारणेबाईक बनवणाऱ्या कंपन्या नेहमीच रायडरच्या आरामासोबतच तांत्रिक बाबींचाही विचार करतात. मागची सीट उंच ठेवण्यामागे केवळ आरामाचाच नव्हे, तर बाईकच्या कार्यक्षमतेचाही विचार असतो.
advertisement
4/7
1. बाईकचा अचूक तोल राखणेहे सर्वात महत्त्वाचे तांत्रिक कारण आहे. बाईकचे दोन्ही टायर रस्त्यावर व्यवस्थित पकड ठेवतात की नाही, हे तपासणे गरजेचे असते. यासाठी पुढच्या आणि मागच्या दोन्ही चाकांवर वजनाचा समतोल राखला जाणे अत्यंत आवश्यक आहे.सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमागची सीट उंच बनवल्यामुळे, मागे बसलेल्या व्यक्तीचे वजन बाईकच्या गुरुत्वमध्यबिंदूजवळ (Center of Gravity) राहते.यामुळे बाईकचा तोल व्यवस्थित राखला जातो आणि विशेषत: वेगात असताना किंवा वळणावर बाईक अस्थिर होण्याची शक्यता कमी होते.
advertisement
5/7
2. अधिक 'स्मूथ' रायडिंगचा अनुभवउंच पिलियन सीटवर बसलेला व्यक्ती नैसर्गिकरित्या थोडासा पुढे झुकतो.रायडर आणि पिलियन रायडरचे वजन सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीच्या जवळ आल्याने बाईकची स्थिरता (Stability) वाढते.हवेचा दाब (Air Pressure) यामुळे वेगात असताना हवेचा दाबही थोडा कमी होतो आणि रायडिंग करताना 'स्मूथ' अनुभव मिळतो.
advertisement
6/7
3. लांबच्या प्रवासासाठी आरामउंच सीटचा थेट संबंध बाईकच्या सस्पेंशन सिस्टीमशी (Suspension System) असतो.उंच जागेमुळे बाईकचे सस्पेंशन अधिक चांगल्या पद्धतीने काम करते. सस्पेंशनला रस्त्यावरचे धक्के शोषून घेण्यासाठी जास्त जागा मिळते.यामुळे रस्त्यावरचे झटके (Jerks) कमी जाणवतात आणि लांब पल्ल्याचा प्रवासही अधिक आरामदायी होतो.
advertisement
7/7
पुढच्या वेळी तुम्ही तुमच्या बाईकची उंच सीट पाहाल, तेव्हा ती केवळ एक डिझाईन नाही, तर सुरक्षितता, समतोल आणि आरामदायक प्रवासासाठी केलेला एक वैज्ञानिक उपाय आहे, हे तुमच्या लक्षात येईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Bike : बाईकच्या मागची सीट उंच का असते? स्टाइल नाही यामागे असं कारण, ऐकून म्हणाल 'अरे हे मला आधी का नाही कळलं'