TRENDING:

वडिलांना दिलेले वचन पहिल्याच प्रयत्नात पूर्ण, 22 व्या वर्षी तरुणी बनली गावातली पहिली IAS

Last Updated:
IAS Success Story : यूपीएससी देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. लाखो उमेदवारांमधून अगदी काही जण यात उत्तीर्ण होतात. मात्र, एका ग्रामीण भागातील एका तरुणीने हे यश मिळवून दाखवले आणि ही तरुणी गावातील पहिली IAS बनली. आज जाणून घेऊयात या तरुणीची प्रेरणादायी कहाणी. (शशिकांत ओझा/पलामू, प्रतिनिधी)
advertisement
1/7
वडिलांना दिलेले वचन पहिल्याच प्रयत्नात पूर्ण, 22 व्या वर्षी तरुणी बनली गावातली..
सुलोचना मीणा असे या तरुणीचे नाव आहे. फक्त 22 व्या वर्षी ही तरुणी आयएएस बनली. त्यांची पहिली पोस्टिंग ही झारखंड जिल्ह्यातील पलामू जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी म्हणून झाली.
advertisement
2/7
IAS सुलोचना मीणा या राजस्थानच्या सवाई माधोपुरच्या आदलवाडा गावातील रहिवासी आहेत. 2021 मध्ये त्यांनी यूपीएससीची परीक्षा दिली. 2022 मध्ये त्याचा निकाल आला आणि त्या 415 वी रँक मिळवत आयएएस झाल्या. त्यांनी एसटी प्रवर्गातून 6वी रँक मिळवली.
advertisement
3/7
लोकल18 शी बोलताना सुलोचना यांनी सांगितले की, याठिकाणी येऊन चांगले वाटत आहे. येथील लोक चांगले सहकार्य करत आहेत. मला शिक्षण आणि व्यवस्थेवर लक्ष द्यायचे आहे. तसेच महिला सुरक्षेवर काम करायचे आहे.
advertisement
4/7
बालपणापासून आयएएसचे स्वप्न पाहिले होते. बारावीनंतर दिल्ली विद्यापीठात बीएस्सी बॉटनीसाठी प्रवेश घेतला. त्यावेळी एनएसएसमध्येही भाग घेतला. त्यानंतर 2021 मध्ये यूपीएससीची परीक्षा दिली. मी माझ्या वडिलांना वचन दिले होते.
advertisement
5/7
मी गावातील पहिली मुलगी आहे, जी IAS अधिकारी बनली आहे. तसेच जिल्हाभरात 22 व्या वर्षी यूपीएससी पास केलेली पहिली महिला आहे. आता गावातील तरुणी यूपीएससीचे स्वप्न पाहत आहेत, असे त्यांनी सांगितले.
advertisement
6/7
कॉलेज पूर्ण झाल्यावर वर्तमानपत्रे, चालू घडामोडींचा अभ्यास करावा. तसेच पूर्व परिक्षेसाठी मॉक टेस्टवर भर द्यावा. तसेच दररोज 8 ते 9 तास अभ्यास करावा. सुरुवातीला वर्तमान पत्र वाचण्यासाठी मला 5 ते 6 तास लागत होते.
advertisement
7/7
यानंतर NCERT च्या कोर्सशी संबंधित रिलेटेड पुस्तके वाचली. टेस्ट सीरीजवर सर्वात जास्त फोकस केला. यूट्यूब आणि टेलिग्रामवर अनेक फ्री क्लासेस आणि नोट्स आहेत, त्याची मदत कुणीही घेऊ शकते. मी सुद्धा घेतली, असे त्या म्हणाल्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/करिअर/
वडिलांना दिलेले वचन पहिल्याच प्रयत्नात पूर्ण, 22 व्या वर्षी तरुणी बनली गावातली पहिली IAS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल