दोनदा अपयश, पण शेवटी मैदान मारलंच!, 'ब्यूटी विथ ब्रेन' असलेल्या आयपीएस अधिकारी आशना चौधरी, PHOTOS
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
IPS Aashna Chaudhary Success Story : आज आपण भल्याभल्या मॉडेल्सलाही मात देणाऱ्या एक सुंदर अशा आयपीएस अधिकारी महिलेची प्रेरणादायी कहाणी जाणून घेणार आहोत. आशना चौधरी असे या आयपीएस अधिकारी तरुणीचे नाव आहे. त्या उत्तरप्रदेशातील हापूर जिल्ह्यातील पिलखुवा येथील रहिवासी आहे. सोशल मीडियावर त्या एक फेमस सेलिब्रेटी झाल्या आहेत. आज इन्स्टाग्रामवर त्यांचे 264K फॉलोवर्स आहेत. (अदिती शुक्ला/गाझियाबाद, प्रतिनिधी)
advertisement
1/5

आयुष्यात जे तुम्हाला हवं आहे, त्यासाठी तुम्ही दिवस रात्र मेहनत करा, आणि प्रामाणिकपणे त्यासाठी मेहनत करा. असे तुम्ही केल्यास निश्चितच तुम्हाला तुमचे ध्येय मिळेल, असे आयपीएस अधिकारी आशना चौधरी सांगतात.
advertisement
2/5

त्या एका सुशिक्षित कुटुंबातून येतात. त्याच्या कुटुंबात अनेक जण प्राध्यापक आहेत. त्यामुळे आशना सुद्धा पीएचडी करतील, असे अनेकांना वाटायचे. मात्र, त्यांचा विचार वेगळा होता. त्यांचे वडील सरकारी सेवेत होते. त्यामुळे ते नेहमी अधिकाऱ्यांबाबत घरी चर्चा करायचे. यामुळे आशना या सरकारी सेवेकडे आकर्षित झाल्या.
advertisement
3/5
आशना यांनी गाझियाबादमध्ये दिल्ली पब्लिक स्कूल येथून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर लेडी श्रीराम कॉलेज येथून इंग्रजी साहित्यात पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी साउथ एशियन यूनिव्हर्सिटी येथून आंतरराष्ट्रीय संबंध या विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले. यादरम्यान, त्यांनी अनेक परीक्षा दिल्या. जोश टॉक्सने त्यांना एनालिस्टच्या पोस्टवरुन रिजेक्टही केले होते. मात्र, त्यांनी निराश न होता मेहनत केली.
advertisement
4/5
त्यामुळे मास्टर्स नंतर त्यांनी एका वर्षासाठी ब्रेक घेतला आणि यूपीएससीची तयारी सुरू केली. त्या नियमित 8-9 तास शिक्षण घ्यायच्या. त्या मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करायच्या. त्यांना वेळ लावून सोडवायच्या. त्यांना दोनदा अपयश आले. मात्र, त्यांनी न खचता पुन्हा प्रयत्न केले आणि शेवटी तिसऱ्या प्रयत्नात यश मिळवले. आशना यांनी यूपीएससीमध्ये 116 वी रँक मिळवली आणि त्या आयपीएस अधिकारी झाल्या. जोपर्यंत तुम्ही खचत नाहीत, धीर सोडत नाहीत, तोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत राहायला हवा. कारण शेवटी प्रयत्न करणाऱ्यांची कधीच हार होत नाही, असे त्या सांगतात. त्यांचा हा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे.
advertisement
5/5
आयपीएस अधिकारी आशना चौधरी यांना 'ब्यूटी विद ब्रेन' म्हटले जाते. आज सोशल मीडियावर त्या एक सेलिब्रेटी झाल्या आहेत. इन्स्टाग्रामवर त्यांचे 264K फॉलोवर्स आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/करिअर/
दोनदा अपयश, पण शेवटी मैदान मारलंच!, 'ब्यूटी विथ ब्रेन' असलेल्या आयपीएस अधिकारी आशना चौधरी, PHOTOS