सारा, जान्हवी ते आराध्या सगळ्या स्टारकिड्सचं याच शाळेत झालं शिक्षण; किती लाख आहे एका वर्षाची फी?
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
बॉलिवूडच्या स्टारसोबत त्यांच्या मुलांवरही चाहत्यांचं लक्ष असतं. ते काय करतात, कुठे जातात हे पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. नुकतंच स्टारकिडच्या एका कार्यक्रमामुळं धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कुल चर्चेत आलं. पण या शाळेत जाण्यासाठी किती किंमत मोजावी लागते जाणून घ्या.
advertisement
1/7

शाहरुख खानचे मुलं आर्यन, सुहाना आणि अबराम, सारा अली खान, न्यासा देवगण या सगळ्या स्टारकिड्सचं शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कुलमध्ये झालं. याशिवाय आझाद राव खान, जान्हवी कपूर, खुशी, इब्राहिम अली खान, सारा तेंडुलकर, अर्जुन तेंडुलकर आणि इतर अनेक स्टार किड्सची मुलं याच शाळेत शिकली आहेत.
advertisement
2/7
नुकतंच आराध्या बच्चन, तैमूर आणि अबरामच्या परफॉर्मन्समुळे ही शाळा चर्चेत आली. रोहित शर्मा, शाहिद कपूरपासून सगळ्या सेलिब्रिटींची मुलं याच शाळेत शिकतात.
advertisement
3/7
धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधील फीची रचना वर्गानुसार बदलते. रिपोर्टनुसार, एलकेजी ते 7 वी पर्यंत एका वर्षाची फी 1.70 लाख रुपये आहे. म्हणजे महिन्याची फी सुमारे 14,000 रुपये इतकी आहे.
advertisement
4/7
तर या शाळेत इयत्ता 8 वी ते 10 वी पर्यंतची वर्षाची फी 5.9 लाख रुपये, तर इयत्ता 11वी आणि 12वीच्या वर्गाची फी अंदाजे 9.65 लाख आहे.
advertisement
5/7
भारतातील अग्रगण्य शाळांमध्ये गणले जाणारे, धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलची स्थापना 2003 मध्ये मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी केली होती. तेव्हापासून ते आयबी वर्ल्ड स्कूल आहे.
advertisement
6/7
1,30,000 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेल्या या शाळेत आधुनिक सुविधा आणि सर्वांगीण शिक्षण आहे. शाळा सुसज्ज वर्गखोल्या, लँडस्केप खेळाची मैदाने, इंटरनेट सुविधा, पूर्ण वातानुकूलित वर्ग, टेरेस गार्डन, टेनिस कोर्ट आणि अॅक्टिव्हिटी सेंटर असलेली सात मजली इमारत आहे.
advertisement
7/7
DAIS या शाळेत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि आर्थिक मदत देखील उपलब्ध आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/करिअर/
सारा, जान्हवी ते आराध्या सगळ्या स्टारकिड्सचं याच शाळेत झालं शिक्षण; किती लाख आहे एका वर्षाची फी?