TRENDING:

कमी फीमध्ये भरपूर कोर्स, येथून शिक्षण करुन विद्यार्थी कमावतेय लाखो रुपये, हे आहेत टॉप कॉलेज

Last Updated:
DU Top Colleges: भारतातील प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये दिल्ली विद्यापीठाचे नाव आदराने घेतले जाते. या विद्यापीठात आपण शिक्षण घ्यावं, असं भारतातील बहुतांश विद्यार्थ्याचं स्वप्न असतं. जर तुम्हीही दिल्ली विद्यापीठात शिकण्याचा प्रयत्न करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही तुम्हाला दिल्ली विद्यापीठातील टॉप कॉलेज कोणते आहेत, याबाबत जाणून घेऊयात. (अभिषेक तिवारी/दिल्ली, प्रतिनिधी)
advertisement
1/7
कमी फीमध्ये भरपूर कोर्स, येथून शिक्षण करुन विद्यार्थी कमावतेय लाखो रुपये, हे...
दिल्लीतील ज्या कॉलेजेसला NIRF रँकिंग 2023 च्या यादीत सर्वात टॉप क्रमांक मिळाला, त्या महाविद्यालयांची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. दिल्ली विद्यापीठातील टॉप कॉलेजमध्ये मिरांडा हाऊस कॉलजेने पहिला क्रमांक मिळवला आहे. 2023 मध्ये याची रँकिंग ही 74.81 इतकी होती. हे कॉलेज महिलांसाठी एक प्रतिष्ठित संस्था आहे. येथून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी आज विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत आहेत.
advertisement
2/7
दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेज NIRF रँकिंग 2023 मध्ये 72.39 स्कोअरसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. या कॉलेजची स्थापना ही 1899 मध्ये करण्यात आली होती. सायन्स आणि आर्ट्ससाठी हे कॉलेज देशातील सर्वात जुने आणि प्रतिष्ठित असे कॉलेज आहे. येथील विद्यार्थी हे विविध महत्त्वाच्या पदावंर कार्यरत असून कॉलेजची प्रतिष्ठा, मान आणखी वाढवत आहेत.
advertisement
3/7
लेडी श्रीराम कॉलेज फॉर विमेन हेसुद्धा दिल्ली विद्यापीठातील एक टॉप कॉलेज आहे. NIRF रँकिंग 2023 मध्ये हे कॉलेज 69.32 स्कोअर सह 9 व्या ठिकाणी होते. हे कॉलेज महिलांसाठी उच्च शिक्षणाचे एक प्रमुख केंद्र आहे आणि येथील विद्यार्थिनी या विविध क्षेत्रात उच्च ठिकाणी आहेत.
advertisement
4/7
श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स हे महाविद्यालय NIRF रँकिंग 2023 मध्ये 68.86 स्कोअरसह 11 व्या क्रमांकावर होते. या महाविद्यालयाची स्थापना ही 1926 मध्ये लाला श्री राम यांनी केली होती. हे कॉलेज कॉमर्स आणि अर्थशास्त्रासाठी देशातील प्रमुख शिक्षणसंस्था आहे. येथील विद्यार्थी व्यवसाय आणि वित्त क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत आहेत.
advertisement
5/7
हंसराज कॉलेज सुद्धा दिल्ली विद्यापीठातील प्रतिष्ठित कॉलेज आहे. या कॉलेजची स्थापना ही 1948 मध्ये झाली होती. NIRF रँकिंग 2023 मध्ये या कॉलेजला 68.86 स्कोअर सह 12 वी रँक मिळाली होती. येथील विद्यार्थी शैक्षणिक व इतर व्यावसायिक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देत आहेत.
advertisement
6/7
श्री वेंकटेश्वर कॉलेजने NIRF रँकिंग 2023 मध्ये 67.89 स्कोअरसह 13 वी रँक मिळवली होती. याची स्थापना 1961 मध्ये तिरुमाला तिरुपति देवस्थानम ट्रस्टने केली होती. हे कॉलेज विज्ञान, आर्ट्स आणि कॉमर्ससाठी एक प्रमुख शिक्षण संस्था आहे.
advertisement
7/7
दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफंस कॉलेजने NIRF रँकिंग 2023 मध्ये 67.83 स्कोअरसह 14 वी रँक मिळवली होती. या कॉलेजची स्थापना ही 1881 मध्ये झाली होती. अशाप्रकारे तुम्ही या सर्व कॉलेजमध्ये कमी पैशात चांगले कोर्स करुन शिकू शकता आणि चांगले पैसे कमाऊ शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/करिअर/
कमी फीमध्ये भरपूर कोर्स, येथून शिक्षण करुन विद्यार्थी कमावतेय लाखो रुपये, हे आहेत टॉप कॉलेज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल