TRENDING:

Crime News: 'तुमच्यासाठी आई-वडील, मित्र-मैत्रिणी सगळं सोडलं तरी...' डॉक्टर प्रतीक्षाची डोळ्यात पाणी आणणारी सुसाइड नोट

Last Updated:
Chhatrapati Sambhaji Nagar doctor suicide case: डॉक्टर प्रतीक्षाच्या आयुष्यात असं काय घडलं की तिने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला, डोळ्यात पाणी आणणारी 7 पानांची सुसाइड नोट
advertisement
1/7
'आई-वडील, मित्र-मैत्रिणी सगळं सोडलं', प्रतीक्षाची डोळ्यात पाणी आणणारी सुसाईड नोट
अविनाश कानजडे, प्रतिनिधी छत्रपती संभाजनगर : एका महिला डॉक्टर ने आपल्या पतीच्या छळाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. प्रतीक्षा प्रीतम गवारे असं या डॉक्टर महिलेचे नाव असून लग्न झाल्यानंतर अवघ्या चार महिन्यातच या पत्नीने आपलं जीवन संपवलंय.
advertisement
2/7
प्रतीक्षाने सात पानांची सुसाइड नोट लिहून आपलं आयुष्य संपवलं. ही सुसाइड नोट डोळ्यात पाणी आणणारी तर आहेच पण चार महिन्यात तिला होणारा त्रास किती भयंकर आहे हे वाचून अंगावर शहारे आणणारा आहे. तिथे या सुसाईड नोटमध्ये डॉक्टर नवऱ्याने दिलेला त्रास, आई वडिलांची काळजी आणि त्याच्यावरचं प्रेम अशा सगळ्या गोष्टी सविस्तर सांगितल्या आहेत.
advertisement
3/7
आयुष्य संपवण्याआधी तिने आपल्या नवऱ्यासाठी खास कविता देखील लिहिली. संपूर्ण नोटमध्ये तिचं नवऱ्यावर असलेलं प्रेम मात्र त्याची किंमत न ठेवता त्याने केलेला तिचा छळ किती भयंकर आहे हे वाचताना अगदी डोळ्यासमोरुन जातं.
advertisement
4/7
मी खूप प्रेम केलं तुमच्यावर... आपली छोटीशी फॅमिली असेल तुम्हाला मुलगा हवा होता त्याची तयारी करत होतो. पण तुम्ही माझ्यावर ही वेळ आणली....
advertisement
5/7
मी गेल्यावर तुम्हाला नवीन सुंदर हुंडा देणारी बायको भेटेल, माझी कदर केली नाही Atlist दुसऱ्या बायकोची करा आणि सुखी राहा असं प्रतीक्षाने म्हटलं आहे.
advertisement
6/7
मला जाब विचारला जातो, माझ्यावर नजर ठेवायला मित्रांना कॉल केला जातो, नोकरीच्या ठिकाणीही तुमचा धाक असतो.
advertisement
7/7
मला खूप मोठी गायनॅकलॉजिस्ट व्हायचं होतं पण सगळं पाण्यात बुडवलं तुम्ही त्रास देऊन, तुमच्यासाठी मी सगळं सोडलं, तरीही तुमचा माझ्यावर अविश्वास होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/क्राइम/
Crime News: 'तुमच्यासाठी आई-वडील, मित्र-मैत्रिणी सगळं सोडलं तरी...' डॉक्टर प्रतीक्षाची डोळ्यात पाणी आणणारी सुसाइड नोट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल