अखेर अभिनेत्री अश्विनी महांगडेचा राजकारणात प्रवेश, सोडणार 'आई कुठे...' मालिका
- Published by:Minal Gurav
Last Updated:
ashwini mahangade entry in politics : आई कुठे काय करते मालिकेतील अनघा म्हणजेच अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने राजकारणात प्रवेश केला आहे. तिच्या पक्ष प्रवेशाचे फोटो तिने सोशल केलेत.
advertisement
1/7

आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने अखेर राजकारणात प्रवेश केला आहे. अश्विनीने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे.
advertisement
2/7
अभिनेते आणि राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत अश्विनीने राष्ट्रवादीत प्रवेश केला.
advertisement
3/7
राजकारणात प्रवेश केल्यानंतर अश्विनीने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित तिचं राजकारणात प्रवेश करण्यामागचं कारण सांगितलं आहे. अश्विनीने लिहिलंय, "माझे वडील स्व. प्रदीपकुमार महांगडे (नाना) यांनी कायम मा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केले. अगदी गावातल्या निवणुकांपासून ते लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या काळात अगदी झोकून देवून ते काम करायचे".
advertisement
4/7
"जेवायला बसल्यावर चर्चा सुद्धा त्याच. राजकारण हा त्यांचा आवडता विषय. लोकांच्या मदतीला धावून जाणे हे रक्तातच होते त्याच्या. त्यांना कायम कार्यकर्ता बनून राहायला आवडायचे."
advertisement
5/7
"साधारण 4 वर्षांपूर्वी त्यांना जाणवले की #ताई (मी) समाजासाठी काम करू शकते, त्यांच्यासाठी उभी राहू शकते आणि पक्षाने जबाबदारी दिली तर काम करण्याचा आवाका वाढेल. हे त्यांचे स्वप्न अर्थात 4 वर्षानंतर आज #कोजागिरी_पौर्णिनेच्या मुहूर्तावर पूर्ण झाले".
advertisement
6/7
"ही नवीन जबाबदारी मला अजून घडवेल. समाजासाठी काम करायची जाणीव सतत करून देईल. स्वीकारलेले काम जबाबदारीने पूर्ण करण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. यात अनेक लोकांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा होत्या म्हणून हे शक्य झाले. अश्विनीने पोस्टच्या शेवटी शरद पवार यांच्यासह सगळ्या नेत्यांचे आभार मानले आहेत".
advertisement
7/7
"राजकारणातून समाजकार्य घडेल", असं अश्विनीने म्हटलं आहे. आता राजकारणात प्रवेश केल्यानंतर अश्विनी अभिनयातून ब्रेक घेणार का? आई कुठे काय करते ही मालिका सोडणार का? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
अखेर अभिनेत्री अश्विनी महांगडेचा राजकारणात प्रवेश, सोडणार 'आई कुठे...' मालिका