जीम ट्रेनरचं झाला जावई, मुलगी देण्याआधी मराठमोळ्या नुपूरला आमिरने विचारला होता तो एकच प्रश्न
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Nupur Shikhare - Aamir Khan : मराठमोळा नुपूर शिखरे हा आमिर खानचा जावई आहे. आयराशी लग्न होण्याआधी आमिर खानने नुपूरला एकच प्रश्न विचारला होता.
advertisement
1/11

कोणताही बाप आपल्या मुलीचं लग्न लावून देताना चार प्रश्न मुलाला विचारतो. बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान जेव्हा आपल्या एकुलत्या एका मुलीचं लग्न एका मराठमोळ्या, सर्वसामान्य मुलाशी लावून देतो तेव्हाही हा प्रश्न नक्कीच विचारला जातो.
advertisement
2/11
नुपूर शिखरे हा आमिर खानचा जावई. पेशानं फिटनेस ट्रेनर असलेला आमिरचा जावई, लग्नावेळी त्याने त्याला प्रश्न नक्कीच विचारले... याबद्दल स्वत: नुपूर शिखरेनं खुलासा केलाय.
advertisement
3/11
मित्र म्हणे या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत बोलताना नुपूर म्हणाला, "ते स्टार्स आहेत वगैरे, पण ही संपूर्ण फॅमिली खूप खरी माणसं आहेत. रिअलिटी कळणारे आणि अंडरस्टँडिंग असणारे लोक आहेत. एक रिअल डिस्कशन झालं, पैसे वगैरे नाही. पण जनरल."
advertisement
4/11
"मी आमिरला ट्रेन करत होतो. फॅमिलीशी इतके वर्ष कनेक्ट असल्यामुळे सगळे इन अँड आऊट्स त्यांना माहिती होते. म्हणजे मी कुठे प्रोजेक्ट्स केले आहेत किंवा कुठे आहे काय आहे त्यामुळे त्याचं काहीच नव्हतं."
advertisement
5/11
"पण तुला पुढे प्लानिंग आहे का. मी खूप क्लिअर होतो माझ्या आयुष्यात की माझं जे काही चालू होतं ट्रेनिंग, रेसिंग मला हेच करायचं होतं. मला जास्त गोष्टी एक्सप्लोर करायच्या नाहीत. कधी काही वाटलं तर वेगळी गोष्ट आहे. यावरून डिस्क्शन झालं होतं."
advertisement
6/11
नुपूर पुढे म्हणाला, "ते आर्थिकदृष्ट्या इतके स्ट्राँग होते की त्यांचा हा प्रश्न नव्हता की कसे करतील. फक्त पुढचं काय प्लानिंग आहे. कशात इंट्रेस्ट आहे कशात नाही हे सगळं झालं."
advertisement
7/11
"पण तुम्हारा लडका क्या करता है अशा फिल्मी गोष्टी कधी झाल्या नाहीत. हा टोन कधीच नव्हता. माझ्या आई आणि बाबांनी विचारणं की काय प्लान आहे तुझा पुढचा, इतकं सिंपल होतं. त्यानंतर पुढे काहीच डिस्क्शन झालं नाही."
advertisement
8/11
आईला पहिल्यांदा सांगितलं तेव्हा- नुपूरची आई प्रितम शिखरे म्हणाल्या, "मला कळल्यानंतर पहिली रिअँक्शन अशी होती की बापरे, कसं शक्य आहे. एज डिफरंट, लाइफ स्टाइल डिफरंट, आर्थिकदृष्ट्य डिफरंट, त्यांचं सर्कल वेगळं, आम्ही कॉमन. अगदी काहीच नाही. म्हटलं बापरे कसं होणार."
advertisement
9/11
"तू तिचा उत्तम मित्र होऊ शकतोस, पण हे लग्न जमण्याची, लग्न ही कन्सेप्ट आपल्याकडे खूप वेगळी आहे. जबाबदारी आहे. दोन्ही कल्चर वेगळी आहेत. ते असूनसुद्धा त्या दोघांनी एकमेकांची जबाबदारी घेणं याची मला चिंता होती की कसं होणार मॅच."
advertisement
10/11
प्रितम शिखरे पुढे म्हणाल्या, "माझे मिस्टर गेल्यानंतर मला नुपूरचाच सपोर्ट आहे. मला त्याने सांगितल्यानंतर मी, रीना, आमिर जी, आयरा आणि नुपूर बसले होता. आज मी 60 वर्षांची आहे. माझ्या आयुष्यात घडून गेलेले प्रसंग बाहेरून त्यांना कळण्यापेक्षा मला त्यांना सांगायचे होते."
advertisement
11/11
"मी त्यांच्याकडे गेले, मी त्यांना एकच गोष्ट सांगितली की माझी संपत्ती ही फक्त माझा मुलगा आहे. माझ्या काही महत्त्वाच्या गोष्टी मी त्यांच्यापुढ्यात मांडल्या. आमचं खूप चांगलं रिलेशन आहे. फॅमिली बॉडिंग काय असतं ते अनुभवलं."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
जीम ट्रेनरचं झाला जावई, मुलगी देण्याआधी मराठमोळ्या नुपूरला आमिरने विचारला होता तो एकच प्रश्न