Aamir Khan : 'त्यांच्या मुलांच्या शाळेच्या फीही भरायच्या का?', बॉलिवूड स्टार्सच्या विचित्र मागण्या पाहून भडकला आमिर खान
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
आमिर खानने बॉलिवूडमधील स्टार्सच्या जिम, किचनसाठी व्हॅनिटी व्हॅन आणि खासगी कर्मचाऱ्यांचा खर्च निर्मात्यांवर लादण्याच्या चुकीच्या प्रथांवर तीव्र टीका केली.
advertisement
1/7

मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान त्याच्या चित्रपटांच्या बॉक्स ऑफिसवरील रेकॉर्डसाठी ओळखला जातो. पण, आता तो इंडस्ट्रीमधील काही वाईट चालीरीतींबद्दलही उघडपणे बोलला आहे, ज्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. काही अभिनेते निर्मात्यांकडून जिम, किचनसाठी व्हॅनिटी व्हॅन मागतात, असं धक्कादायक विधान आमिरने केलं आहे.
advertisement
2/7
कोमल नाहटासोबत बोलताना आमिरने इंडस्ट्रीतील त्याच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण सांगितली. तो म्हणाला, “मी जेव्हा इंडस्ट्रीत आलो, तेव्हा एक प्रथा होती की, निर्माता अभिनेत्याच्या ड्रायव्हर आणि असिस्टंटचा खर्च उचलायचा. मला ही प्रथा खूपच विचित्र वाटली.”
advertisement
3/7
आमिरने प्रश्न विचारला, “ड्रायव्हर आणि असिस्टंट माझ्यासाठी काम करतात, तर त्यांचा खर्च निर्माता का उचलतोय? जर तो माझ्या कर्मचाऱ्यांचा पगार देतोय, तर उद्या तो माझ्या मुलांची स्कूल फी पण देईल का? हे कुठे थांबणार?”
advertisement
4/7
तो म्हणाला की, निर्मात्याने फक्त तोच खर्च उचलावा जो थेट चित्रपटाशी संबंधित आहे, जसं की मेकअप, हेअर स्टाईल, कॉस्ट्यूम. पण, माझ्या खासगी ड्रायव्हर किंवा हेल्परचा खर्च निर्मात्याला देणं चुकीचं आहे, कारण ते माझ्यासाठी काम करतात.
advertisement
5/7
आमिर खानने सांगितलं की, ही समस्या आता खूपच गंभीर झाली आहे. तो म्हणाला, “मी ऐकलं आहे की, आजकालचे स्टार्स त्यांच्या ड्रायव्हर्सनाही पगार देत नाहीत, ते निर्मात्याकडूनच तो वसूल करतात. इतकंच नाही, तर ते स्पॉट बॉय, ट्रेनर आणि शेफचाही खर्च घेतात.”
advertisement
6/7
आमिरने पुढे एक खूपच गंभीर विधान केलं. तो म्हणाला, “मी ऐकलं आहे की, आता तर काही स्टार्स सेटवरच लाइव्ह किचन ठेवतात आणि निर्मात्याकडून त्याचा खर्च वसूल करतात. ते किचन आणि जिमसाठी वेगळ्या व्हॅनिटी व्हॅनही मागवतात.”
advertisement
7/7
आमिरने स्पष्ट केलं की, त्याला या सुविधांबद्दल काहीच आक्षेप नाही, पण हा खर्च निर्मात्यावर लादणं चुकीचं आहे. तो म्हणाला, “हे स्टार्स करोडो रुपये कमावतात आणि तरीही त्यांच्या गरजा पूर्ण करू शकत नाहीत? मला हे खूपच लाजिरवाणं वाटतं. हे इंडस्ट्रीसाठी खूपच वाईट आणि हानिकारक आहे.”
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Aamir Khan : 'त्यांच्या मुलांच्या शाळेच्या फीही भरायच्या का?', बॉलिवूड स्टार्सच्या विचित्र मागण्या पाहून भडकला आमिर खान