'मी महाराष्ट्राचा खरा 'धुरंधर'; निवडणुकीच्या धामधुमीत अभिजीत बिचुकले असं का म्हणाले?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Abhijit Bichukale : महाराष्ट्राचा अस्ली 'धुरंधर' मी असल्याचं वक्तव्य डॉ. अभिजीत बिचुकले यांनी केलं आहे. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
1/7

निवडणुका आल्या की डॉ. अभिजीत बिचुकले चर्चेत येतात. सध्या बीएमसी निवडणुकीच्या धामधुमीत अभिजीत बिचुकले एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. आपल्या वक्तव्याने त्यांनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
advertisement
2/7
'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात सहभागी झालेली अभिनेत्री स्मिता गोंदकरने नुकतंच 'बिग बॉस मराठी'च्या रियूनियन पार्टीचं आयोजन केलं होतं. यावेळी 'बिग बॉस मराठी'च्या आतापर्यंतच्या पाच सीझनपैकी अनेक स्पर्धक सहभागी झाले होते.
advertisement
3/7
स्मिता गोंदकर आयोजित 'बिग बॉस मराठी'च्या पार्टीत अभिजीत बिचुकलेंनीही हजेरी लावली होती. अभिजीत बिचुकले 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या सीझनमध्ये सहभागी झाले होते. तसेच सलमानचा 'बिग बॉस 15'चा सीझनदेखील त्यांनी गाजवला होता.
advertisement
4/7
अभिजीत बिचुकले 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या सीझनमध्ये पहिल्या दिवसापासूनच आपल्या हटके स्वभावामुळे आणि वक्तव्यामुळे चर्चेत होते. अभिजीत बिचुकले यांना एक दिवस देशाचं पंतप्रधान आणि राष्ट्रपती व्हायचं आहे. याबाबत अनेकदा त्यांनी भाष्य केलं आहे.
advertisement
5/7
दरम्यान अभिजीत बिचुकले यांनी स्मिता गोंदकरच्या बिग बॉस रियूनियन पार्टीत केलेल्या वक्तव्याने मात्र चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या बॉक्स ऑफिस गाजवणाऱ्या 'धुरंधर' फिल्मबाबत त्यांनी भाष्य केलं आहे.
advertisement
6/7
अभिजीत बिचुकले म्हणाले आहेत,'धुरंधर'सारखा मी दिसतो. 'धुरंधर' फिल्ममधलं जे कॅरेक्टर आहे ते 50-100 दिवसांत तुम्ही विसरून जाल. पण महाराष्ट्राचा अस्ली धुरंधर मी आहे डॉ. अभिजीत बिचुकले".
advertisement
7/7
अभिजीत बिचुकले यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी त्यांनी व्हाईट टी-शर्ट, ब्लॅक जॅकेट, काळा चष्मा आणि कपाळावर लाल रंगाचा टिळा असा लूक केला होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'मी महाराष्ट्राचा खरा 'धुरंधर'; निवडणुकीच्या धामधुमीत अभिजीत बिचुकले असं का म्हणाले?