TRENDING:

वयाच्या 54व्या वर्षी बोहल्यावर चढला अभिनेता, बायको 17 वर्षांनी लहान, PHOTO

Last Updated:
आर्यन खानच्या सीरिजमध्ये काम करणाऱ्या एका 54 वर्षांच्या अभिनेत्याने त्याच्यापेक्षा 17 वर्षांनी लहान असलेल्या मुलीसोबत लग्न केलं. दोघांची लव्ह स्टोरी फिल्मी आहे.
advertisement
1/8
वयाच्या 54व्या वर्षी बोहल्यावर चढला अभिनेता, बायको 17 वर्षांनी लहान, PHOTO
प्रेमात पडण्यासाठी वयाचं बंधन नसतं असं म्हणतात. आता हेच घ्या की, 54 वर्षीय मनीष चौधरी यांनी 17 वर्षांनी लहान असलेल्या महिलेशी लग्न केलं आहे. दोघे पहिल्यांदा थिएटरमध्ये भेटले. तिथे त्यांचं प्रेम जमलं. पण लग्नापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. 
advertisement
2/8
'द बॅड्स ऑफ बॉलीवूड' सध्या चर्चेत आहे. आर्यन खानच्या वेबसिरीजमध्ये मनीष चौधरी फ्रेडी सोडावालाची भूमिका साकारत आहे, फ्रेडीची खऱ्या आयुष्यातील लव्ह स्टोरी फार रंजक आहे.  
advertisement
3/8
हाऊसरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितलं, माझी बायको आणि माझ्यात 17 वर्षांचं अंतर आहे. आमच्या वयात इतकं मोठं अंतर असूनही आम्ही एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. 
advertisement
4/8
श्रुती म्हणाली की, "जेव्हा मनीषने त्याचे वय सांगितले तेव्हा तिला विश्वास बसत नव्हता कारण हा फरक खूप मोठा होता. आमच्यात 17 वर्षांचा फरक आहे. जेव्हा मी त्याला विचारले, "तुझे वय किती आहे?" आणि तो मला म्हणाला, आपल्यात वयाचा फरक आहे पण तो किती ते मलाही माहिती नव्हतं."
advertisement
5/8
श्रुतीनं सांगितलं की, "आमच्या वयात अंतर असूनही आमचं नातं टिकलं. वयाचा फरक काहीही असो आपण खूप मोठा काळ एकत्र राहणार आहोत.  तू माझ्यापेक्षा जास्त काळ जगतोस पण मी तुझ्याशिवाय एक दिवसही जगू शकत नाही."
advertisement
6/8
श्रुतीला त्यांच्या नात्याबद्दल तिच्या कुटुंबीयांना पटवून देण्यासाठी तिला दोन वर्ष लागली. ती म्हणाली, "माझ्या कुटुंबाला पटवून देण्यासाठी मला काही वर्षे लागली. लग्न केलं तर याच माणसाशी करेन, नाहीतर मी लग्न करणार नाही, असं मी सांगितलं होतं. सर्वांना शांतपणे पटवून देण्यासाठी जवळजवळ दोन वर्षे लागली."
advertisement
7/8
प्रपोज कोणी केलं याबद्दल सांगताना श्रृती म्हणाली, आमचं प्रपोजल खूप आळशी होतं.  कोविड होता, आम्ही सोफ्यावर बसलो होतो आणि त्याने विचारले, 'तू माझ्याशी लग्न करशील का?'  मी म्हणाले, हे प्रपोजल आहे? तो हो म्हणाला, त्यावर मीही ठीक आहे म्हणत हसले.  
advertisement
8/8
2016मध्ये मनीष चौधरी यांचा साखरपुडा झाला होता. पण त्यांचं लग्न होऊ शकलं नाही. अखेर वयाच्या 54व्या वर्षी त्यांनी 36 वर्षांच्या  श्रृतीसोबत लग्न केलं. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
वयाच्या 54व्या वर्षी बोहल्यावर चढला अभिनेता, बायको 17 वर्षांनी लहान, PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल