Nagpur Crime : चाकूने गळा चिरला, दगडाने ठेचून मारला; नागराज मंजुळेंच्या 'झुंड'मधला बाबू छत्री होता कोण?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Jhund Actor Murder : झुंड सिनेमातील 'बाबू छत्री'ची नागपूरमध्ये हत्या करण्यात आली. कोण होता झुंडमधील 'बाबू छत्री'?
advertisement
1/9

मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमिताभ बच्चन यांच्या झुंड सिनेमात काम करणाऱ्या अभिनेत्याची हत्या करण्यात आली आहे. अभिनेता बुधवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास जखमी अवस्थेत आढळला. या घटनेनं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अभिनेता नागपूरमध्ये राहत होता. या घटनेनं संपूर्ण नागपूर हादरलं आहे.
advertisement
2/9
प्रियांशु क्षत्रिय असं अभिनेत्याचं नाव आहे. बाबू छत्री नावाने तो ओळखला जात होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे मध्यरात्री 1:30 वाजता प्रियांशू गंभीर जखमी अवस्थेत आढळला. त्याच्या गळ्याभोवती वायर गुंडाळलेली होती.
advertisement
3/9
पोलीस तपासात समोर आले की, प्रियांशूवर यापूर्वीही काही गुन्हे दाखल होते. त्याची बहीण शिल्पा छत्री हिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतरल पोलिसांनी ध्रुव शाहू नावाच्या आरोपीला अटक केली आहे. वैयक्तिक पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे.
advertisement
4/9
प्रियांशू नागपूरमधील जरीपटका पोलीस हद्दीतल्या नारा जवळच्या पडक्या निर्मनुष्य घरात मृतावस्थेत आढळला. गजानन नगरितल्या एका निर्माणाधिन इमारतीला लागून हे घर आहे. इथेच तो त्याच्या नशेडी मित्र दारू, गांजा आणि व्हाईटरनची नशा करत बसायचे.
advertisement
5/9
तीन वर्षांआधी आलेल्या झुंड सिनेमात प्रियांशू दिसला होता. त्याने अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम केलं होतं. नागराज मंजुळे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. हा सिनेमा झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांच्या जीवनावर आणि गुन्हेगारीकडून खेळाकडे वळण्याच्या प्रवासावर आधारित होता.
advertisement
6/9
झुंड सिनेमा रिलीज झाल्यानंतर त्याला मानकापूरातील पाच लाख चोरी केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली होती.
advertisement
7/9
झुंड या सिनेमात प्रियांशूने 'बाबू' ही भूमिका साकारली होती. त्याच्या अभिनयाने आणि डायलॉगने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. पण या सिनेमाचा त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर कोणताच बदल झाला नाही.
advertisement
8/9
प्रियांशू हा उत्तम फुटबॉलपटू होता. त्याच्या याच गुणामुळे त्याची झुंडसाठी निवड झाली होती. पण चुकीच्या संगतीमुळे त्याला अंमली पदार्थांचं व्यसन लागलं होतं.
advertisement
9/9
प्रियांशू चोरी करायचा. चोरीच्या पैशांतून नशा करायचे. त्याचे वडील रोजंदारी मजूर असून त्याला तीन मोठ्या बहिणी आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Nagpur Crime : चाकूने गळा चिरला, दगडाने ठेचून मारला; नागराज मंजुळेंच्या 'झुंड'मधला बाबू छत्री होता कोण?