TRENDING:

माधुरी दीक्षितची मैत्रीण, सिग्नलवर मागायची भीक; अजय देवगणला खांद्यावर उचलून झाली फेमस, 'या' व्यक्तीशी केलं लग्न

Last Updated:
Bollywood Actress Tragic Life : बॉलिवूडच्या काही व्यक्तिरेखा अगदी छोट्या असल्या तरी त्या कायम आठवणीत राहतात. अशीच एक व्यक्तिरेखा म्हणजे 'दिल' चित्रपटातील 'मिस मिमी'.
advertisement
1/8
माधुरीची मैत्रीण, सिग्नलवर मागायची भीक; अजय देवगणला खांद्यावर उचलून झाली फेमस
मुंबई: बॉलिवूडच्या काही व्यक्तिरेखा अगदी छोट्या असल्या तरी त्या कायम आठवणीत राहतात. अशीच एक व्यक्तिरेखा म्हणजे 'दिल' चित्रपटातील 'मिस मिमी'. माधुरी दीक्षितच्या मैत्रिणीची भूमिका साकारणाऱ्या 'मिस मिमी'ला पाहताच अनेक गमतीशीर सीन्स डोळ्यासमोर येतात.
advertisement
2/8
पण पडद्यावर हास्य फुलवणाऱ्या या अभिनेत्रीची खरी कथा खूपच वेगळी आणि दु:खद आहे, याचा खुलासा नुकताच अभिनेता आदि इराणीने केला आहे.
advertisement
3/8
आदि इराणीने एका मुलाखतीत 'दिल' चित्रपटाच्या शूटिंगचा एक खास किस्सा सांगितला. चित्रपटात माधुरी, आमिर खान आणि आदि इराणी यांच्यात एका बॉक्सिंग रिंगचा सीन आहे. यात हरणाऱ्याला 'मिस मिमी'चे किस घ्यावे लागते. या भूमिकेसाठी निर्मात्यांना अशी मुलगी हवी होती, जिचा रंग-रूप आकर्षक नसेल, जेणेकरून किसच्या कल्पनेनेच प्रेक्षकांना हसू येईल.
advertisement
4/8
दिग्दर्शक इंदर कुमार अशाच चेहऱ्याच्या शोधात होते. एकदा रस्त्याने जात असताना त्यांची नजर सिग्नलवर उभ्या असलेल्या एका मुलीवर पडली, जी इतर लोकांपेक्षा वेगळी होती. इंदर कुमार यांनी लगेच ठरवले की, या छोट्या भूमिकेसाठी याच मुलीला घेणार.
advertisement
5/8
इंदर कुमार यांच्या सहाय्यकाने त्यांना सांगितले की, "सर, ती मुलगी तर भिकारीण आहे, ती कशी काम करेल?" यावर इंदर कुमार म्हणाले, "अभिनय मी करून घेईन, पण भूमिकेसाठी जो चेहरा हवा आहे, ती हीच मुलगी आहे!" आणि अशाप्रकारे, रस्त्यावर भीक मागणारी ही मुलगी थेट 'मिस मिमी' बनून चित्रपटाचा भाग झाली.
advertisement
6/8
चित्रपटात काम केल्यानंतर 'मिस मिमी' अनेक चित्रपटांमध्ये दिसली. सोनाली बेंद्रे आणि ट्विंकल खन्नाच्या चित्रपटांमध्येही तिने काम केले. 'दिलजले', 'मेला' आणि 'बेटा' यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने लहान-मोठ्या भूमिका केल्या. विशेषतः अजय देवगणला आपल्या खांद्यावर उचलून घेण्याचा तिचा सीन खूप गाजला.
advertisement
7/8
आदि इराणीने पुढे सांगितले की, चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर 'मिस मिमी'ने एका ट्रक ड्रायव्हरसोबत मोठ्या थाटामाटात लग्न केले आणि ती आनंदी जीवन जगू लागली.
advertisement
8/8
पण नंतर तिच्या आयुष्यात पुन्हा वेदना परतल्या. लहानपणी भीक मागताना व्यवस्थित खानपान न मिळाल्याने तिची तब्येत बिघडली. आदि इराणीच्या माहितीनुसार, ती मानसिकरित्या आजारी होती आणि याच कारणामुळे तिचे निधन झाले. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, 'मिस मिमी' या नावाने प्रसिद्ध झालेल्या या अभिनेत्रीची खरी ओळख किंवा नाव आजपर्यंत कोणालाही माहीत झालेले नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
माधुरी दीक्षितची मैत्रीण, सिग्नलवर मागायची भीक; अजय देवगणला खांद्यावर उचलून झाली फेमस, 'या' व्यक्तीशी केलं लग्न
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल