लग्नाआधीच मोडला संसार? स्मृती-पलाशनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीच्या नात्यात फूट, साखरपुड्यानंतर घडलं महाभारत
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Nivetha Pethuraj Engagement Broke: स्टार क्रिकेटर स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचं लग्न ऐन मुहूर्तावर मोडल्याची बातमी ताजी असतानाच, आता एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या आयुष्यातही असाच हायव्होल्टेज ड्रामा सुरू असल्याची चर्चा आहे.
advertisement
1/11

मुंबई: सध्या मनोरंजन विश्वात आणि क्रीडा जगतात एकीकडे सनई-चौघड्यांचे सूर ऐकू येत असतानाच, दुसरीकडे मात्र इंडस्ट्रीतील लाडक्या जोडप्यांची नाती तुटल्याच्या बातम्यांनी चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे.
advertisement
2/11
भारतीय क्रिकेटची स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचं लग्न ऐन मुहूर्तावर मोडल्याची बातमी ताजी असतानाच, आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या आयुष्यातही असाच हायव्होल्टेज ड्रामा सुरू असल्याची चर्चा आहे.
advertisement
3/11
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करणारी निवेथा पेथुराज आहे! साखरपुडा होऊन अवघे तीन महिने उलटत नाहीत तोच निवेथाचा होणारा संसार सुरू होण्यापूर्वीच मोडला की काय, अशी शंका घेण्यास वाव देणारी एक मोठी घडामोड समोर आली आहे.
advertisement
4/11
सोशल मीडियाच्या काळात नात्याची सुरुवात जशी पोस्टने होते, तसाच शेवटही पोस्ट डिलीट करण्यावरूनच ओळखला जातो. निवेथा पेथुराजने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून साखरपुड्याचे सर्व शाही फोटो हटवले आहेत.
advertisement
5/11
इतकंच नाही, तर तिने तिचा होणारा पती राजहित इब्रान याला अनफॉलोदेखील केलं आहे. राजहितनेही निवेथाला अनफॉलो केल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
6/11
साधारण दोन वर्षे अभिनयापासून दूर राहिल्यानंतर निवेथाने गेल्या नोव्हेंबरमध्ये मोठ्या दिमाखात इंडस्ट्रीमध्ये पुनरागमन केलं होतं. दुबईतील व्यावसायिक राजहित इब्रानसोबतचा साखरपुडा उरकून तिने चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. पण आता हा आनंदाचा प्रवास लग्नापर्यंत पोहोचण्याआधीच थांबल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
advertisement
7/11
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या बाबतीतही असंच घडलं होतं. लग्नाच्या आदल्या रात्रीच वऱ्हाड परतलं आणि नंतर स्मृतीने अधिकृत पोस्ट करत लग्न मोडल्याचं जाहीर केलं.
advertisement
8/11
निवेथाच्या बाबतीतही हाच पॅटर्न दिसत असल्याने चाहते चिंतेत आहेत. स्मृती आणि पलाशनेही सुरुवातीला फोटो डिलीट केले होते आणि आता निवेथाच्या बाबतीतही तेच घडताना दिसत आहे.
advertisement
9/11
निवेथाने २०१६ मध्ये 'ओरु नाल कूथु' या तमिळ चित्रपटातून आपल्या करिअरची दमदार सुरुवात केली होती. अल्पावधीतच तिने तेलुगू आणि तमिळ सिनेसृष्टीत आपले स्थान निर्माण केले. तिने विजय सेतुपती, जयम रवी आणि प्रभू देवा यांसारख्या दाक्षिणात्य सुपरस्टार्ससोबत स्क्रीन शेअर केली आहे.
advertisement
10/11
निवेथा पुन्हा एकदा अभिनयात कमबॅक करणार असतानाच तिच्या वैयक्तिक आयुष्यातील हे वादळ तिच्या करिअरवर काय परिणाम करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवेथाने अद्याप यावर कोणतंही अधिकृत भाष्य केलेलं नाही.
advertisement
11/11
तांत्रिक बिघाडामुळे फोटो गायब झाले आहेत की खरंच नात्यात ब्रेक लागला आहे, हे येणारा काळच सांगेल. पण सध्या निवेथाच्या चाहत्यांसाठी ही बातमी पचवणं कठीण जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
लग्नाआधीच मोडला संसार? स्मृती-पलाशनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीच्या नात्यात फूट, साखरपुड्यानंतर घडलं महाभारत