खुशखबर! मुंबईत बेस्ट बसनंतर मेट्रोतही विद्यार्थ्यांना मोफत प्रवास, सरकार घेणार निर्णय?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
Mumbai News : मुंबईतील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बेस्टनंतर आता मुंबई मेट्रोतही मोफत प्रवासाची सुविधा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
advertisement
1/6

मुंबईतील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबई आणि नागपूरमधील विद्यार्थ्यांना लवकरच मेट्रो मधून मोफत प्रवास करता येणार आहे, मात्र याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही.
advertisement
2/6
मुंबईतील शालेय विद्यार्थ्यांना प्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषत: वाहतूक कोंडीमुळे शालेय वेळेत शाळा पोहोचणे अवघड होते. त्यासाठी बेस्ट बसमधील मोफत प्रवासाची सुविधा शालेय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
advertisement
3/6
मात्र, मेट्रोनेही शहरात प्रवास सोपा केला आहे तरी रोजच्या भाड्यामुळे विद्यार्थ्यांना अडचण येत आहे. मुंबईतील शालेय विद्यार्थ्यांना मेट्रोमध्येही मोफत प्रवासाची सुविधा देण्याची मागणी वाढत आहे.
advertisement
4/6
उद्धवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी विधान परिषदेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे याची शिफारस केली. त्यांच्या मते शालेय वेळेत मोफत प्रवासामुळे विद्यार्थी वेळेची बचत करू शकतील शिवाय सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करू शकतील.
advertisement
5/6
विद्यार्थ्यांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे केवळ त्यांच्या शिक्षणाला चालना देणार नाही तर पालकांच्या आर्थिक भारालाही काही प्रमाणात कमी करेल. तसेच मेट्रोचा वापर वाढल्याने रस्त्यावरील वाहतुकीतून देखील सुटका मिळेल.
advertisement
6/6
शालेय विद्यार्थ्यांच्या हितासाठी ही योजना लवकर अंमलात आणण्याची आवश्यकता असल्याचे शिंदे यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
खुशखबर! मुंबईत बेस्ट बसनंतर मेट्रोतही विद्यार्थ्यांना मोफत प्रवास, सरकार घेणार निर्णय?