मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे स्टेशन परिसरात प्रिती राणे शेअर ट्रेडिंग क्लासेस आहे. या ठिकाणी आधी पैसे भरा महिन्याला ४ ते ८ % परतावा मिळवा असं सांगून फसवणूक झाल्याचा आरोप गुंतवणूकदारांनी केला आहे. राज्यभरातून १००० हून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे चित्र आता समोर आलं आहे.
सदर या प्रकरणी ठाणे नगर पोलीस स्टेशन आणि ठाणे आर्थिक गुन्हे शाखा यांच्याकडे गुंतवणूकदारांनी तक्रार अर्ज केला असून आमचे पैसे पुन्हा मिळावे आणि पुन्हा कोणी अशा भुलतापाला बळी न पडता अशी गुंतवणूक करु नये, असं गुंतवणूकदारांनी सांगितलं.
advertisement
5 लाख गुंतवले होते
'माझं गाव हे सावंतवाडी आहे. या कंपनीच्या सागर किरवाडे आणि प्रिती राणे हे आम्हाला भेटले होते. त्यांनी दादर इथं आमचे क्लासेस असल्याचं सांगितलं होतं. मी दादरला आलो आणि त्यांच्या सेमिनारला आलो होतो. त्या सेमिनारमध्ये त्यांनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यावर काही टक्के वाढवून पैसे देऊ असं आश्वासन दिलं होतं. त्यांनी ५ लाख रुपये साईन करण्यास सांगितलं होतं. ते ८ टक्के देणार होते. पण, माझ्या मित्रांनी सेमिनारला आले आणि त्यांनी पैसे गुंतवले होते, असं तक्रारदार सिद्धेश भाईडकर यांनी सांगितलं.
कोरोना काळापासून फसवणूक
'प्रिती शेअर ट्रेडिंग अशी कंपनी आहे. ही कंपनी ट्रेडिंगचे क्लासेस घेत होती. कोरोनाच्या काळात बरेच लोक घरी बसलेली होती. या लोकांनी या कंपनीमध्ये बरेच पैसे गुंतवले होते. या कंपनीची प्रिती राणे हिने तिच्या भाच्याच्या खात्यात पैसे जमा करत होते. रोज शेअर मार्केटबद्दल खोटी माहिती देत होते, या कंपनीने ५०० पेक्षा जास्त लोकांना फसवलं आहे, असा आरोपी ॲडव्होकेट सचिन शेट्टी यांनी केला आहे.
