Smriti Mandhana : गालावर खळी, चेहऱ्यावर तेज... पांढऱ्या वन पीसमध्ये अवतरली स्मृती, घायाळ करणारे 7 Photo
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टीम इंडियाची उपकर्णधार स्मृती मानधना हिचा एका कार्यक्रमातला ग्लॅमरस लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पांढऱ्या वन पीसमध्ये स्मृती मानधनाचं सौंदर्य खुलून दिसत आहे.
advertisement
1/7

भारतीय महिला टीमला पहिला वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या स्मृतीच्या आयुष्यात मागच्या महिन्यात मोठं वादळ आलं. स्मृती आणि पलाश मुच्छल यांचं लग्न मोडलं. यावरून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं. स्वत: स्मृतीनेच सोशल मीडियावर पोस्ट करून लग्न तुटल्याची माहिती दिली.
advertisement
2/7
आयुष्याच्या या कठीण काळातून स्मृती सावरताना दिसत आहे. काहीच दिवसांपूर्वी स्मृती लग्न तुटल्यानंतर पहिल्यांदाच समोर आली आणि क्रिकेट हेच आपलं प्रेम असल्याचं तिने सांगितलं.
advertisement
3/7
यानंतर आता स्मृती आणखी एका कार्यक्रमात आली होती. पांढऱ्या वन पीसमध्ये स्मृती ग्लॅमरस दिसत आहे. स्मृतीच्या गालावर खळी आणि चेहऱ्यावरचं तेज पाहून तिच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.
advertisement
4/7
स्मृती मानधना ही 21 डिसेंबरपासून पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात दिसणार आहे. भारतीय महिला टीम आणि श्रीलंकन महिला टीम यांच्यात 5 टी-20 मॅचची सीरिज खेळवली जाणार आहे. या सीरिजमध्ये टीम इंडियाची उपकर्णधार स्मृती खेळताना दिसेल.
advertisement
5/7
भारत आणि श्रीलंका यांच्यातली 5 टी-20 मॅचची सीरिज संपल्यानंतर महिला प्रीमीयर लीगला सुरूवात होणार आहे. 9 जानेवारीपासून वुमन प्रीमीयर लीगचं आयोजन करण्यात आलं आहे.
advertisement
6/7
महिला प्रीमियर लीगमध्ये स्मृती मानधना आरसीबीकडून खेळते. तसंच ती आरसीबीची कर्णधारही आहे. महिला प्रीमियर लीगमध्ये आरसीबीचा पहिला सामना 9 जानेवारीला मुंबई इंडियन्सविरुद्ध आहे.
advertisement
7/7
भारताची वर्ल्ड कप विजेती कर्णधार हरमनप्रीत कौर ही मुंबई इंडियन्सचीही कर्णधार आहे. त्यामुळे महिला प्रीमियर लीगच्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाची कर्णधार आणि उपकर्णधार आमने-सामने असतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Smriti Mandhana : गालावर खळी, चेहऱ्यावर तेज... पांढऱ्या वन पीसमध्ये अवतरली स्मृती, घायाळ करणारे 7 Photo