मुलगी झाली हो! अक्षय वाघमारे दुसऱ्यांदा झाला बाबा, म्हणाला,"लक्ष्मी घरी आली"
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Akshay Waghmare Wife Yogita Gawli : अक्षय वाघमारे आणि अरुण गवळींची लेक योगिता गवळी यांच्या घरी 28 नोव्हेंबर 2025 रोजी चिमुकल्या पाहुणींचं आगमण झालं आहे. अभिनेत्याने पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
advertisement
1/7

अक्षय वाघमारे आणि अरुण गवळी यांची लेक योगिता गवळी यांच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमण झालं आहे. सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत त्यांनी चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.
advertisement
2/7
अक्षय वाघमारे आणि अरुण गवळी 2020 मध्ये लग्नबंधनात अडकले होते. त्यानंतर एका वर्षाने त्यांना मुलगी झाली. अर्ना असं तिचं नाव आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्या घरी एका मुलीचं आगमण झालं आहे. 'मुलगी झाली हो' असं कॅप्शन देत अक्षयने चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे.
advertisement
3/7
न्यूज 18 मराठीसोबत बोलताना अक्षय वाघमारे म्हणाला,"योगिताने आज सकाळी मुलीला जन्म दिला आहे. मला खरंच खूप आनंद झालाय. आज दुर्गाष्टमी आहे आणि लक्ष्मी घरी आली आहे. त्यामुळे आज घरी सण साजरा होणार आहे".
advertisement
4/7
अक्षय पुढे म्हणाला,"मी, योगिता, मम्मी, डॅडी सर्वांनाच खूप आनंद झाला आहे. माझ्या आई-बाबांना खूप आनंद झालाय. देवाने दिलेली ही सुंदर भेट आहे. आम्हाला झालेला आनंद शब्दात न सांगता येणारा आहे".
advertisement
5/7
अक्षयची पत्नी योगिताचा डोहाळेजेवणाचा कार्यक्रम काही महिन्यांपूर्वी पुण्यात पार पडला होता. बेबी शॉवरचे हे फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. अक्षय आणि योगिताच्या आयुष्यात पुन्हा एक नवी पाहुणी आल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे.
advertisement
6/7
अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी यांचा कोरोनाकाळात लग्नसोहळा पार पडला होता. त्यावेळी असलेल्या सर्व नियमांचं पालन करुन त्यांनी दगडी चाळीत लग्न केलं होतं.
advertisement
7/7
अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी यांच्यावर सध्या चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
मुलगी झाली हो! अक्षय वाघमारे दुसऱ्यांदा झाला बाबा, म्हणाला,"लक्ष्मी घरी आली"