TRENDING:

सुनील शेट्टीचा फिटनेस फंडा! सकाळी 6 वाजता जीम, आण्णा दुपारी 1 वाजता करतो महत्त्वाचं काम, ते काय?

Last Updated:
Suniel Shetty Fitness : सुनील शेट्टी आज वयाच्या 65 व्या वर्षीही फिटनेसफ्रिक आहेत. नुकतंच एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या फिटनेसचं रहस्य, डाएट रुटिन शेअर केलं आहे.
advertisement
1/7
सुनील शेट्टीचा फिटनेस फंडा! आण्णा दुपारी 1 वाजता करतो महत्त्वाचं काम, ते काय?
सुनील शेट्टी आज वयाच्या 65 व्या वर्षीही फिट अँड फाइन आहेत. एखाद्या 25 वर्षाच्या तरुणाला लाजवेल अशी त्यांची बॉडी आहे. मेहनतीच्या जोरावर त्यांनी ही बॉडी बनवली आहे. आजही त्यांचं एक खास फिटनेस रुटिन आहे. एक विशिष्ट डाएट प्लॅन ते फॉलो करतात.
advertisement
2/7
सुनील शेट्टी एबीपीसोबत आपला फिटनेस फंडा शेअर करत म्हणाले,"लहानपणापासूनच मी स्पोर्ट्ससोबत जोडला गेलो होतो. शाळेत असताना मी स्पोर्ट्सचा कॅप्टन होतो. लहान असतानाच मी मार्शल आर्ट्सचं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली होती. लाइफस्टाइल, डाएट, एकमेकांचा आदर करणं या सर्व गोष्टी मी मार्शल आर्ट्समुळे शिकलो. लोकांना ताकद दाखवण्यापेक्षा स्वत:ला फिट ठेवण्यासाठी मी मार्शल आर्ट्स शिकत होतो.
advertisement
3/7
सुनील शेट्टी फिटनेसबद्दल बोलताना म्हणाले,"सात-आठ तासाची झोप खूप महत्त्वाची असते. एखाद्या गोष्टीत सातत्य ठेवलं की शिस्त येते. मी रोज सकाळी साडे पाच वाजता उठतो, सहा वाजता जीमला जातो. वेट ट्रेनिंग, प्रोटिन या सर्व गोष्टींमध्ये सातत्य ठेवतो. माझ्यासाठी फिटनेस म्हणजे आनंद. मी दररोज 1600-2000 कॅलरी इनटेक करतो".
advertisement
4/7
सुनील शेट्टी दुपारी 1 वाजता जेवण केल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता जेवण करतात. मध्ये काहीही खात नाहीत. सुनील शेट्टींचा फास्टिंगवर विश्वास आहे. साऊथ इंडियन असल्यामुळे त्यांच्या आहारात ब्राऊंड राईसचा समावेश असतो. हिरव्या फळभाज्या आणि पालेभाज्यांचा समावेश ते आहारात करतात".
advertisement
5/7
सुनील शेट्टी घरचं जेवण करण्यावर भर देतात. आहारात तेल, साखर आणि मिठ कंट्रोल करणं गरजेचं असतं. त्यामुळे या तीन गोष्टींकडे प्रामुख्याने ते लक्ष देतात. सुनील शेट्टी आजही सर्व प्रकारच्या पार्ट्यांपासून दूर आहे.
advertisement
6/7
सुनील शेट्टी आज लोकप्रिय अभिनेते असेल तरी त्यांना मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागला आहे. सफाई कामगाराचा मुलगा असलेल्या सुनील शेट्टी यांनी फक्त आपल्या कौशल्याने देशभरात नाव कमावलं आहे.
advertisement
7/7
बॉलिवूडमधील हँडसम अभिनेत्यांमध्ये सुनील शेट्टी यांचा समावेश आहे. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सुनील शेट्टीचा फिटनेस फंडा! सकाळी 6 वाजता जीम, आण्णा दुपारी 1 वाजता करतो महत्त्वाचं काम, ते काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल