यापुढे मराठी मार खाणार नाही! Dhurandhar च्या वादळासमोर छाती तानून उभा आहे हा मराठी सिनेमा
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Dhurandhar Vs Marathi Movies : 'धुरंधर' ही फिल्म बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करत असली तरी या सिनेमासमोर एका मराठी चित्रपटाने मात्र हार मानलेली नाही.
advertisement
1/7

'धुरंधर' (Dhurandhar) ही हिंदी फिल्म देशभरातील बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करत आहेत. रिलीजच्या 16 दिवसांत या सिनेमाने 500 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. जगभरात या फिल्मचा बोलबाला पाहायला मिळत आहे. रिलीजच्या तीन आठवड्यांनंतरही या फिल्मची क्रेझ कमी झालेली नाही. पण या सुपरहिट हिंदी सिनेमासमोर एका मराठी सिनेमाने मात्र हार मानलेली नाही.
advertisement
2/7
क्षितिज पटवर्धन दिग्दर्शित 'उत्तर' हा मराठी सिनेमा 12 डिसेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला. रेणुका शहाणे, अभिनय बेर्डे आणि हृता दुर्गुळे यांचा हा हृदयस्पर्शी चित्रपट नातेसंबंधांवर आधारित असल्याने प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. साधी सरळ कथा असणारा हा कौटुंबिक चित्रपट आहे.
advertisement
3/7
क्षितिज पटवर्धनचा 'उत्तर' हा दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा असला तरीही सुपरहिट ठरला आहे. बॉक्स ऑफिस गाजवणाऱ्या एका हिंदी सिनेमासमोर ही मराठी फिल्म ताठ मानेने उभी आहे. संपूर्ण महाराष्ट्राभरातील मराठी प्रेक्षक आपल्या कुटुंबांसमवेत ही फिल्म पाहायला आवडीने जात आहेत.
advertisement
4/7
क्षितिज पटवर्धनने 'उत्तर' या चित्रपटासाठी् सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहिलं आहे,"चार पाच वर्षातून एकदा येणारा बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर' आणि चार पाच वर्षातून एकदा येणारा ग्लोबल फेनॉमेना 'अवतार' यांच्यासोबत माझा पहिला सिनेमा उत्तर प्रदर्शित झाला. धुरंधरने रणवीरच्या कॉंट्रोव्हर्सीनंतर सगळा नॅरेटिव्ह अक्षय खन्नावर फिरवला आणि मुळातच पॉवरफुल असलेल्या या सिनेमाने अजून जोर पकडला".
advertisement
5/7
क्षितिज पटवर्धनने लिहिलं आहे,"22-22 शोज होते. अशावेळी पहिला सिनेमा घेऊन आलेला दिग्दर्शक म्हणून मी सगळ्यात आधी ठरवलं की व्हिक्टीम कार्ड खेळायचं नाही. शोज मिळत नाही अशी अजिबात तक्रार करायची नाही. मराठी विरुद्ध हिंदी असं काहीही नॅरेटिव्ह आणायचं नाही. उलट जिथे शोज मिळतील ते कसे चालतील याकडे लक्ष द्यायचं. 12 ला सिनेमा रिलीज झाला ज्याला शहरांमधून उत्तम प्रतिसाद मिळाला. पण तेव्हाच वाटलं की सिनेमा 19 ला रिलीज होतोय असं ट्वीट करुया आणि आणखी लोकांपर्यंत पोचवुया. मग कोल्हापूर, पुणे, आज मुंबई, वेगवेगळी कॉलेजेस, स्पर्धा, समारंभ इथे उपस्थिती लावली. सिनेमाबद्दल सांगितलं आणि त्याबद्दलची जागरूकता वाढवली".
advertisement
6/7
क्षितिजने पुढे लिहिलं आहे,"परीक्षणं अप्रतिम आली. वीकडेडलासुद्धा शहरी सेंटर्समध्ये चांगली ऑक्युपन्सी होती. एशियन फेस्टिव्हलला सिलेक्शन झालं. बुक माय शोवर अप्रतिम रेटिंग आलं. दोन तुफानी सिनेमांसोबतच्या संघर्षाला सकारात्मक पद्धतीने तोंड दिलं आणि पुढेही देऊ. यात मराठी माध्यमं खूप उत्तम सपोर्ट करतात. आमच्या कल्पनांची दखल घेत आहेत. आज दुसरा वीकेंड आहे आणि सहा ठिकाणी शोज वाढवले आहेत. अवतारचे रिव्ह्यू मिक्स्ड आहेत आणि धुरंधर लहान मुलांसोबत बघता येत नाही. अशा वेळी 'मराठी फॅमिली फिल्म' म्हणून उत्तरचं पोझिशनिंग केलं. ज्याला वाढता प्रतिसाद मिळतोय".
advertisement
7/7
अशी वेळ याआधी आणि यापुढे अनेक मराठी सिनेमांवर येणार आहे. तेव्हा स्वत:च्या कन्टेन्टवर विश्वास ठेवून व्हिक्टीम कार्ड न खेळता, हुशारीने आणि एक एक दिवस लढूनच सिनेमा पोचवावा लागणार आहे. एवढचं वाटलं की या सगळ्यात एक मेसेज जाणं गरचेचं होतं की कितीही मोठा हिंदी आणि इंग्लीश सिनेमा येऊ दे, मराठी सिनेमा मार खाणार नाही! द फाईट इज ऑन, असं क्षितिज पटवर्धन आपल्या पोस्टमध्ये म्हणाला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
यापुढे मराठी मार खाणार नाही! Dhurandhar च्या वादळासमोर छाती तानून उभा आहे हा मराठी सिनेमा