Guess Who: वडील रस्त्यावर विकायचे नारळपाणी, आई करायची धुणीभांडी, आज अभिनेता Oscar जिंकण्याच्या तयारीत
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Guess Who: ज्या मुलाने गरिबीचे चटके सोसले, ज्याच्या आईने लोकांच्या घरी साफसफाई करून त्याला वाढवलं आणि ज्याच्या वडिलांनी रस्त्यावर नारळपाणी विकून घर चालवलं, तोच मुलगा आज 'ऑस्कर'च्या शर्यतीत पोहोचला आहे.
advertisement
1/11

मुंबई: मुंबईच्या चकाचक दुनियेमागे संघर्षाच्या अशा अनेक कहाण्या दडलेल्या असतात, ज्या ऐकल्यावर अंगावर काटा येतो. अशीच एक हृदयस्पर्शी कहाणी सध्या जगभरात चर्चेत आहे.
advertisement
2/11
ज्या मुलाने गरिबीचे चटके सोसले, ज्याच्या आईने लोकांच्या घरी साफसफाई करून त्याला वाढवलं आणि ज्याच्या वडिलांनी रस्त्यावर नारळपाणी विकून घर चालवलं, तोच मुलगा आज 'ऑस्कर'च्या शर्यतीत पोहोचला आहे. हे नाव दुसरं तिसरं कोणी नसून अष्टपैलू अभिनेता विशाल जेठवा आहे.
advertisement
3/11
६ जुलै १९९४ रोजी मुंबईत एका मध्यमवर्गीय गुजराती कुटुंबात विशालचा जन्म झाला. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. वडील नरेश जेठवा नारळपाणी विकून जे काही मिळवायचे, त्यात घर चालवणं कठीण होतं. अशा वेळी विशालच्या आईने, प्रीती जेठवा यांनी कंबर कसली.
advertisement
4/11
त्यांनी दुसऱ्यांच्या घरी जाऊन साफसफाईची कामं केली, धुणी-भांडी केली आणि प्रसंगी सॅनिटरी पॅड्स विकून मुलाचं शिक्षण पूर्ण केलं. विशालने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, "आईला कष्ट करताना बघूनच मला आयुष्यात काहीतरी मोठं करण्याची जिद्द निर्माण झाली."
advertisement
5/11
विशालने आपल्या अभिनयाची सुरुवात टीव्ही मालिकांमधून केली. २०१३ मध्ये 'भारत का वीर पुत्र – महाराणा प्रताप' या मालिकेत त्याने तरुण अकबराची भूमिका साकारली आणि प्रेक्षकांच्या नजरेत भरला. त्यानंतर 'संकटमोचन महाबली हनुमान', 'दिया और बाती हम' आणि 'क्राइम पेट्रोल' सारख्या अनेक शोजमधून त्याने अभिनयाचे धडे गिरवले.
advertisement
6/11
पण त्याला खरी ओळख मिळाली ती २०१९ मध्ये, जेव्हा त्याने राणी मुखर्जीच्या 'मर्दानी २' चित्रपटात मुख्य खलनायक 'सनी' साकारला. एका निष्पाप दिसणाऱ्या मुलामध्ये इतका भयानक क्रूर गुन्हेगार दडलेला असू शकतो, हे विशालने आपल्या अभिनयातून सिद्ध केलं.
advertisement
7/11
या एका भूमिकेने त्याला बॉलिवूडमधील सर्वांना त्याची दखल घेण्यास भाग पाडलं. त्यानंतर 'सलाम वेंकी'मध्ये काजोलसोबतचा त्याचा भावनिक अभिनय पाहून अख्खा देश रडला.
advertisement
8/11
विशाल जेठवाच्या करिअरमधील सर्वात मोठी भरारी म्हणजे 'होमबाउंड' हा चित्रपट. नीरज घायवान यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा भारत सरकारतर्फे ऑस्कर २०२६ साठी अधिकृत एन्ट्री म्हणून पाठवण्यात आला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जगभरातील ८६ देशांच्या चित्रपटांमधून हा चित्रपट आता 'टॉप १५' मध्ये शॉर्टलिस्ट झाला आहे.
advertisement
9/11
इतकंच नाही, तर कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२५ मध्ये या चित्रपटाच्या स्क्रीनिंगनंतर प्रेक्षकांनी तब्बल ९ मिनिटं उभे राहून टाळ्या वाजवल्या. विशालने यात 'चंदन कुमार' ही अशी भूमिका साकारली आहे, ज्याचा संघर्ष त्याच्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याशी मिळताजुळता होता.
advertisement
10/11
कधीकाळी इंग्रजी बोलताना घाबरणारा हा मुलगा आज हॉलिवूडच्या दिग्गजांसोबत रेड कार्पेटवर वावरत आहे. एवढं यश मिळूनही विशाल आजही तितकाच नम्र आहे. कान्स फेस्टिव्हलला जाताना तो प्रचंड नर्वस होता. "मी एका साध्या बॅकग्राउंडमधून आलोय, माझं इंग्रजी कच्चं आहे, लोक मला स्वीकारतील का?" अशी भीती त्याला वाटत होती.
advertisement
11/11
पण त्याने त्याच्या कामातून जगाला उत्तर दिलं. आज जेव्हा लोक त्याला 'ऑस्कर शॉर्टलिस्टेड अभिनेता' म्हणतात, तेव्हा त्याच्या आईच्या डोळ्यातील आनंदाश्रू हेच त्याच्यासाठी सर्वात मोठं पारितोषिक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Guess Who: वडील रस्त्यावर विकायचे नारळपाणी, आई करायची धुणीभांडी, आज अभिनेता Oscar जिंकण्याच्या तयारीत