TRENDING:

पाकिस्तानला कधी येणार? चाहत्याच्या प्रश्नावर आलिया भट्टचं थेट उत्तर, होतंय व्हायरल

Last Updated:
Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टला नुकताच एका पाकिस्तानी चाहत्याने पाकिस्तानला कधी येणार? असा प्रश्न विचारला आहे. कपूरांच्या सूनेच्या उत्तराचं मात्र सर्वत्र कौतुक होत आहे.
advertisement
1/7
पाकिस्तानला कधी येणार? चाहत्याच्या प्रश्नावर आलिया भट्टचं थेट उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट नुकतीच सौदी अरेबियात सुरू असलेल्या Red Sea International Film Festival 2025 मध्ये दुसऱ्यांदा सहभागी झाली होती. या फेस्टिव्हलमधील एका खास सेशनमध्ये आलियाने आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावर मोकळेपणाने भाष्य केलं.
advertisement
2/7
आलियाने या खास सेशनच्या सुरुवातीला आपली लाडकी लेक राहाचं कौतुक केलं. आलिया भट्ट हसत म्हणाली,"राहा आता एवढी मोठी झाली आहे की ती आता आईला नुसते प्रश्न विचारत असते. राहा आता पापराझीला ओळखायला लागली आहे. त्यामुळे त्यांच्यासोबतही तिने तिचं वेगळं नातं निर्माण केलं आहे".
advertisement
3/7
सेशनदरम्यान आलियाच्या एका पाकिस्तानी चाहत्याने तिला प्रश्न विचारला की,"पाकिस्तानला कधी येणार?". या प्रश्नाचं उत्तर देत आलिया म्हणाली,"माझं काम जिथे मला घेऊन जाईल, तिथे मी जाईल". आलियाच्या या उत्तराने सर्वांची मने जिंकली आहेत.
advertisement
4/7
आलियाने या प्रश्नाचं उत्तर देताना परिस्थिती किती समजूतदारपणे हाताळली याबद्दल तिचं कौतुक होत आहे. आलिया सध्या खरेपणा आणि प्रामाणिकपणे वागण्यावर भर देताना दिसत आहे. आलिया म्हणाली,"प्रेक्षक नेहमी चांगल्या कामासोबत जोडले जाता. काम आवडलं तर कौतुक करतात. नाही आवडलं तर तेही सांगतात. त्यामुळे आज मी जे काही करत आहे ते खरेपणाने करत आहे".
advertisement
5/7
कान्स, मेटगाला अशा ग्लोबल इव्हेंटमध्ये खूप तामजाम असतो. पण या इव्हेंटला हजेरी लावल्यानंतर लगेचच मी माझ्या मूळ पदावर येते आणि पिझ्झा खाण्यात रमते.
advertisement
6/7
आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळाबाबत बोलताना आलिया भट्ट म्हणाली,"करिअरच्या सुरुवातीला मला सगळं काही करुन पाहायचं होतं. त्यामुळे मी पळत होते. 17-18 वर्षांची आलिया खूप उत्साही होती. बिंदास्त होती. आताही माझ्यात उत्साह आहे पण थोडी शांत झाले आहे. यश आणि अपयश या दोन गोष्टींमुळे आपण सतर्क होतो. पण तरीही मला त्या 18 वर्षांच्या आलियाला जिवंत ठेवायचं आहे. जिला पुढे काय होणार याचा अंदाज नव्हता".
advertisement
7/7
आलिया पुढे म्हणाली,"प्रत्येकवेळी क्युरिअस राहायला मला आवडतं. देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रेझंट करण्यात एक अभिमान वाटतो. सातासमुद्रापार आलियाने दिलेल्या या मुलाखतीचं कौतुक होत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
पाकिस्तानला कधी येणार? चाहत्याच्या प्रश्नावर आलिया भट्टचं थेट उत्तर, होतंय व्हायरल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल