महागड्या गाड्यांमध्ये फिरणारी आलिया! लेकीसाठी बांधलं 250 कोटींचं घर, एवढे पैसे येतात कुठून?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Alia Bhatt Net Worth and Income Source : आलिया भट्टने 'स्टुडंट ऑफ द इयर' मधून अभिनयाची सुरुवात केली. तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आणि टॉप अभिनेत्री बनली. आलिया लग्झरी आयुष्य जगते. तिची एकूण संपत्ती किती? तिचे इनकम सोर्स काय?
advertisement
1/8

'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमातून अभिनेत्री आलिया भट्ट हिने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर तिने 2 स्टेट्स, हायवे, डिअर जिंदगी, राजी, गली बॉय, गंगूबाई काठियावाडी यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. अभिनयामुळे तिला ओळख मिळाली आणि ती इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींमध्ये गणली जाऊ लागली.
advertisement
2/8
फोर्ब्स आणि इतर मीडिया अहवालांनुसार, आलिया भट्टची एकूण संपत्ती सुमारे 550 कोटी आहे. ती भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
advertisement
3/8
आलियाच्या कमाईचा प्रमुख स्रोत म्हणजे चित्रपट. ET Now च्या रिपोर्टनुसार, ती प्रत्येक चित्रपटासाठी 10 ते 12 कोटी फी घेते. याशिवाय जाहिराती, ब्रँड एंडोर्समेंट, गुंतवणूक, आणि व्यवसाय यांतूनही ती कमाई करते.
advertisement
4/8
आलियाने आतापर्यंत 6 फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत. तिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे. 2023 मध्ये तिने नेटफ्लिक्सवरील Heart of Stone या अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण केले, जिथे ती Gal Gadot आणि Jamie Dornan सोबत झळकली.
advertisement
5/8
2022 मध्ये आलियाने रणबीर कपूरशी लग्न केले. त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांना मुलगी राहा झाली. आलिया फक्त अभिनेत्रीच नाही तर एक यशस्वी व्यावसायिकही आहे. तिचा स्वतःचा कपड्यांचा ब्रँड आहे – Add-A-Mamma. या ब्रँडला PETA India कडून 2021 मध्ये Best Vegan Kidswear Brand चा पुरस्कार मिळाला.
advertisement
6/8
2017 मध्ये तिने Coexist नावाचा पर्यावरणपूरक उपक्रम सुरू केला. 2019 मध्ये Eternal Sunshine Productions ही स्वतःची प्रॉडक्शन कंपनी सुरू केली. आलियाने Nykaa आणि भारतातील पहिल्या बायोमटेरियल स्टार्टअप Phool.co मध्येही गुंतवणूक केली आहे.
advertisement
7/8
मुंबईत आलियाचा 32 कोटींचा आलिशान बंगला आहे तर लंडनमध्ये 25 कोटींचं घर आहे. लेकीसाठी आलिया आणि रणबीरने मिळून 400 कोटींचं घर बांधलं आहे.
advertisement
8/8
इतकंच नाही तर महागडं कार करेक्शन आलियाकडे आहे. ज्यात Audi Q7, BMW 7 Series, Land Rover या कारचा समावेश आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
महागड्या गाड्यांमध्ये फिरणारी आलिया! लेकीसाठी बांधलं 250 कोटींचं घर, एवढे पैसे येतात कुठून?