अलका कुबलचा ऑनस्क्रिन भाऊ, सुपरस्टारचा मुलगा; वयाच्या साठीत 25 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत करणार रोमान्स
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अलका कुबल यांचा ऑनस्क्रिन भाऊ म्हणून फेमस झालेला हा हिरो नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वयाच्या साठीत 25 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमँटीक सीन्समध्ये दिसणार आहे.
advertisement
1/8

नव्या सिनेमांच्या माध्यमातून अनेक एव्हरग्रीन कलाकार पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसत आहेत. असाच एक अभिनेता एका लोकप्रिय अभिनेत्रीसोबत नव्या सिनेमात दिसणार आहे. हा अभिनेता मराठी इंडस्ट्रीतील एव्हरग्रीन अभिनेत्यांपैकी एक आहे.
advertisement
2/8
हा अभिनेता आज 62 वर्षांचा आहे. पण त्याचा फिटनेस तरुणांना लाजवेल असा आहे. बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरही या अभिनेत्याच्या फिटनेसवर फिदा झाला. हा अभिनेता आता टेलिव्हिजनच्या टॉपच्या अभिनेत्रीसोबत दिसणार आहे.
advertisement
3/8
हा अभिनेता एका सुपरस्टार मराठी अभिनेत्याचा मुलगा आहे. आई-वडिलांप्रमाणेच या अभिनेत्यानं देखील अभिनय क्षेत्रात नाव कमावलं. अलका कुबलचा ऑनस्क्रिन भाऊ म्हणूनही हा अभिनेता प्रेक्षकांच्या भेटीला आला.
advertisement
4/8
33 वर्षांआधी आलेला 'माहेरची साडी' हा सिनेमा आजही तितकाच लोकप्रिय आहे. प्रेक्षक आजही हा सिनेमा आवडीने पाहतात. अभिनेत्री अलका कुबल यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमानं लाखो स्त्रियांच्या डोळ्यात पाणी आणलं.
advertisement
5/8
अलका कुबल यांच्या माहेरची साडी या सिनेमात मराठी इंडस्ट्रीतील तगडी स्टारकास्ट होती. सगळ्याच कलाकारांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. आजही ही पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.
advertisement
6/8
या सिनेमात अलका कुबल यांच्याबरोबर अभिनेते अजिंक्य देव देखील महत्त्वाच्या भूमिकेत होते. अलका कुबल यांच्या भावाची भूमिका त्यांना साकारली होती.
advertisement
7/8
हेच अजिंक्य देव आता 'असा मी तशी मी' या आगामी मराठी सिनेमात दिसणार आहेत. या सिनेमात अजिंक्य देव अभिनेत्री तेजश्री प्रधानबरोबर स्क्रिन शेअर करणार आहेत.
advertisement
8/8
जवळपास 24 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीसोबत अंजिक्य देव रोमँटीक अंदाजात दिसणार आहे. 'असा मी तशी मी' हा सिनेमा येत्या 28 नोव्हेंबर 2025 ला रिलीज होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
अलका कुबलचा ऑनस्क्रिन भाऊ, सुपरस्टारचा मुलगा; वयाच्या साठीत 25 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत करणार रोमान्स