एकीकडे घटस्फोटाची चर्चा, दुसरीकडे हंसिका मोटवानीने बदललं आडनाव; अभिनेत्रीने का उचललं टोकाचं पाऊल?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Hansika Motwani Changed Surname : घटस्फोटाच्या वावड्या उठत असतानाच हंसिका मोटवानीने इन्स्टाग्रामवर आपले आडनाव बदलले आहे. ज्यामुळे तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे!
advertisement
1/9

मुंबई: बॉलिवूड आणि साऊथची लोकप्रिय अभिनेत्री हंसिका मोटवानी हिने डिसेंबर २०२२ मध्ये बिझनेसमॅन सोहेल खतूरिया याच्यासोबत मोठ्या थाटात लग्न केले. मात्र, लग्नाला फार काळ लोटत नाही तोच या दोघांच्या नात्यात खटके उडाल्याच्या आणि थेट घटस्फोटाच्या चर्चांना जोर धरला आहे.
advertisement
2/9
या सर्व चर्चांना विराम देण्याऐवजी, हंसिका मोटवानीने आता असे एक मोठे पाऊल उचलले आहे, ज्यामुळे तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे!
advertisement
3/9
घटस्फोटाच्या वावड्या उठत असतानाच हंसिका मोटवानीने इन्स्टाग्रामवर आपले आडनाव बदलले आहे. तिने तिच्या आडनावाच्या स्पेलिंगमध्ये बदल केला आहे.
advertisement
4/9
हंसिकाच्या आडनावाचं जुनं स्पेलिंग Motwani होतं. तिने आता हे स्पेलिंग बदलून नवीन स्पेलिंग Motwanni असं ठेवलं आहे.
advertisement
5/9
हंसिकाने आपल्या आडनावात एक्स्ट्रा 'n' जोडले आहे. सामान्यतः सेलिब्रिटीज असे बदल त्यांच्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक जीवनात सकारात्मकता आणण्यासाठी न्यूमरॉलॉजी म्हणजेच अंकशास्त्रानुसार करतात.
advertisement
6/9
बॉलिवूडमध्ये अंकशास्त्रावर विश्वास ठेवणारे अनेक कलाकार आहेत. अभिनेता राजकुमार राव आणि आयुष्मान खुराना यांसारख्या कलाकारांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये अशा प्रकारचे बदल केले आहेत. काही लोक याला लकी मानतात, तर काही आपल्या कामात अधिक यश मिळावे यासाठी असे बदल करतात.
advertisement
7/9
हंसिकाने हे पाऊल नेमके कोणत्या कारणास्तव उचलले, हे तिने स्पष्ट केलेले नाही. मात्र, सध्या तिची नात्यातील खटपट आणि घटस्फोटाच्या चर्चा सुरू असल्याने, तिने हा बदल वैयक्तिक आयुष्यातील स्थिरता किंवा नवीन सुरुवात म्हणून केला असावा, असा अंदाज लावला जात आहे.
advertisement
8/9
हंसिकाने बालकलाकार म्हणून 'शाका लाका बूम बूम' या मालिकेतून करियरची सुरुवात केली होती. नंतर ती हृतिक रोशनच्या 'कोई मिल गया' मध्ये दिसली. २००७ मध्ये अल्लू अर्जुनच्या 'देसामुदुरु' मधून तिने साऊथमध्ये पदार्पण केले.
advertisement
9/9
हंसिकाच्या लग्नावर आधारित 'लव्ह, शादी और ड्रामा' नावाची डॉक्यू-सिरीज देखील जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित झाली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
एकीकडे घटस्फोटाची चर्चा, दुसरीकडे हंसिका मोटवानीने बदललं आडनाव; अभिनेत्रीने का उचललं टोकाचं पाऊल?