'अनिल कपूरमुळे माझ्या अडचणी वाढल्या, कुठेही गेलो तरी लोकं म्हणतात...', मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Maharashtra CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अभिनेता अनिल कपूरच्या एका चित्रपटाचा उल्लेख करत एक मोठा खुलासा केला आहे.
advertisement
1/6

मुंबई: राजकारणी आणि अभिनेते यांची जुगलबंदी नेहमीच मनोरंजक असते. 'फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री' (FICCI) च्या एका कार्यक्रमात अभिनेता अक्षय कुमारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची खास मुलाखत घेतली.
advertisement
2/6
यावेळी अक्षयने त्यांना एक भन्नाट प्रश्न विचारला आणि फडणवीसांनी त्यावर दिलेले उत्तर ऐकून उपस्थितांमध्ये हशा पिकला. अक्षय कुमारने फडणवीसांना विचारले, “राजकारणातील तुम्ही स्टार आहात. तुम्ही कधी कोणत्या चित्रपटाने किंवा व्यक्तीने प्रभावित झाला आहात का?”
advertisement
3/6
या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीसांनी थेट अभिनेता अनिल कपूरच्या 'नायक' चित्रपटाचा उल्लेख केला आणि एक मजेदार खुलासा केला. ते म्हणाले, “चित्रपट केवळ नेतृत्वालाच नाही, तर मानवी भावनांनाही प्रभावित करतात. राजकारणाविषयी बोलायचं झाल्यास, मी एका चित्रपटाचा आवर्जून उल्लेख करू इच्छितो. त्या चित्रपटाने मला प्रभावित तर केलंच, पण त्यासोबत माझ्या समस्याही वाढवल्या आहेत.”
advertisement
4/6
आपल्या समस्या वाढवणाऱ्या चित्रपटाचे नाव सांगताना फडणवीस म्हणाले, "त्या चित्रपटाचं नाव आहे 'नायक'! या चित्रपटात अभिनेते अनिल कपूर यांनी एका दिवसाचे मुख्यमंत्री बनून दिवसभरात इतकी कामं केली. ते पाहून मी कुठेही गेलो, तरी लोक लगेच म्हणतात, 'सर, नायकसारखं काम करा!' एका दिवसात 'नायक'मध्ये अनिल कपूर किती कामं करतात, ते पहा. त्या चित्रपटाने जणू एक बेंचमार्क तयार केला आहे," असे ते गमतीने म्हणाले. अनिल कपूरच्या एका दिवसाच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामुळे आपल्यावर लोकांच्या अपेक्षांचा कसा दबाव येतो, हे त्यांनी मिश्किलपणे सांगितले.
advertisement
5/6
यानंतर अक्षयने फडणवीसांना एक काल्पनिक प्रश्न विचारला, "जर तुम्ही एका दिवसासाठी चित्रपटाचे दिग्दर्शक बनलात आणि त्या चित्रपटाचं नाव 'महाराष्ट्र' असेल, तर पहिला सीन कोणता चित्रित कराल?"
advertisement
6/6
यावर उत्तर देताना फडणवीस क्षणार्धात म्हणाले, "महाराष्ट्रावर चित्रपट बनत असेल, तर त्यातील पहिला सीन हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा असेल. इतक्या वर्षांच्या गुलामीनंतर पुन्हा एकदा स्वराज्याची निर्मिती... हाच तो सीन असेल!" यानंतर त्यांनी, राजकारणातील त्यांचे खरे हिरो पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याचे सांगून त्यामागचे सविस्तर कारणही सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'अनिल कपूरमुळे माझ्या अडचणी वाढल्या, कुठेही गेलो तरी लोकं म्हणतात...', मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?