TRENDING:

'तुम्ही आमचे आहात', वर्षभरात तिसऱ्यांदा प्रेमानंद महाराजांच्या भेटीला पोहोचले विरुष्का, इमोशनल झाली अनुष्का

Last Updated:
अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली वर्षभरात तिसऱ्यांदा प्रेमानंद महाराजांच्या भेटीला पोहोचले आहेत. प्रेमानंद महाराजांना भेटताच अनुष्का इमोशनल झाली.
advertisement
1/7
वर्षभरात तिसऱ्यांदा प्रेमानंद महाराजांच्या भेटीला पोहोचले विरुष्का
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांनी पुन्हा एकदा प्रेमानंद महाराजांची भेट घेण्यासाठी वृंदावनला पोहोचले. प्रेमानंद महाराज यांना भेटताच अनुष्काला अश्रू अनावर झाले. ती प्रचंड इमोशनल झाल्याचं पाहायला मिळालं.
advertisement
2/7
या भेटीत प्रेमानंद महाराज यांनी अनुष्का आणि विराट यांना खास सल्ला देखील दिला. अनुष्का आणि विराट यांच्या प्रेमानंद महाराजांच्या भेटीचा व्हिडीओ व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
3/7
प्रेमानंद महाराज यांनी विराट आणि अनुष्काला सांगितलं की, "आपलं काम सेवा समजून करा. गंभीर भाव ठेवा, विनम्र रहा आणि नामजप करा. जो माझा खरा पिता आहे त्यांना एकदा तरी पाहावं, अशी इच्छा मनात असली पाहिजे. त्यांना पाहण्याची तळमळ तरी असली पाहिजे."
advertisement
4/7
अनुष्का प्रेमानंद महाराजांना म्हणाली, "महाराजी आम्ही तुमचे आहोत, तुम्ही आमचे आहात." त्यावर प्रेमानंद महाराज हसत म्हणाले, "आपण सगळे श्रीजींचे आहोत. आपण सगळे एकाच छताखाली आहोत. आकाश, हे निळ छत्र आहे, आपण सगळे त्याचीच मुलं आहोत."
advertisement
5/7
मागील वर्षभरात विराट आणि अनुष्का तिसऱ्या वृंदावनला गेले आहेत. दोघे मागील आठवड्यातच युकेहून भारतात परतले आहेत. जानेवारी महिन्यात अनुष्का आणि विराट त्यांच्या दोन्ही मुलांसह प्रेमानंद महाराजांचं दर्शन घेण्यासाठी वृदांवनला पोहोचले होते.
advertisement
6/7
त्यानंतर मे महिन्यात कोहलीने टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेन्ट घेतल्यानंतर प्रेमानंद महाराजांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले होते. तेव्हा विराट आणि अनुष्का 15 मिनिटं प्रेमानंद महाराजांची बोलत होते. अनेक तास ते आश्रमात देखील बसले होते.
advertisement
7/7
विराट 24 डिसेंबरला होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहे. त्यानंतर जानेवारीमध्ये न्यूझीलँड विरुद्ध वनडे सीरिजमध्येही खेळताना दिसणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'तुम्ही आमचे आहात', वर्षभरात तिसऱ्यांदा प्रेमानंद महाराजांच्या भेटीला पोहोचले विरुष्का, इमोशनल झाली अनुष्का
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल