TRENDING:

विश्वासच बसत नाहीये, आयुष्य अचानक...! लग्नाच्या एक महिन्यातच अपूर्वासोबत हे काय घडलं? सोशल मीडियावर तिनेच सगळं सांगितलं

Last Updated:
Apruva Nemlekar Tanuj Govalkar Marriage : अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने तनुज गोवाळकरसोबत लग्न करून एक महिना झाला आहे. या महिनाभरात अपूर्वासोबत बरंच काही असं घडलं आहे जे तिने आता सोशल मीडियावर सांगितलं आहे.
advertisement
1/7
आयुष्य अचानक...! लग्नाच्या एक महिन्यातच अपूर्वासोबत हे काय घडलं? तिनेच सगळं सांगितलं
14 मार्च, आजपासून बरोबर महिनाभरापूर्वी 14 फेब्रुवारी... व्हॅलेंटाइन डे ला... अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर म्हणजे सगळ्यांची लाडकी 'शेवंता' जिने तिच्या लग्नाची गोड बातमी दिली. तनुज गोवाळकरसोबत तिने लग्नगाठ बांधली.
advertisement
2/7
लग्नानंतर अपूर्वा नेमळेकरचे तिच्या लग्नाचे बरेच फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले. इतकंच नव्हे तर त्यानंतर तिने नवरा तनुजसोबतही काही व्हिडीओ बनवले आणि ते सोशल मीडियावर पोस्ट केले. या महिन्यापासून हे कपल ट्रिपवरच आहे. आधी गोवा, कोकण आणि आता हे कपल हम्पीला गेलं आहे. 13 मार्चला त्यांनी हम्पीला जात असल्याची पोस्ट केली होती.
advertisement
3/7
आज 14 मार्च, या अपूर्वा-तनुजच्या लग्नाला एक महिना झाला. यादिवशी अपूर्वाने एक पोस्ट करत आपलं आयुष्य अचानक इतकं बदललं की विश्वासच बसत नाही, असं म्हटलं आहे. लग्नानंतर महिनाभरात तिचं आयुष्य कसं बदललं हे तिने सांगितलं आहे.
advertisement
4/7
अपूर्वीने सोशल मीडियावर आपल्या लग्नाचा फोटो पोस्ट केला आहे. ज्यात ती म्हणाली, तनू वेड्स अप्पू एक महिना झाला. सगळं बॉलिवूड फिल्मसारखं वाटतं आहे. किती छान, क्रेझी, प्रेमाने भरलेला महिना होता. लग्नाचा गोंधळ त्यानंतर सतत ट्रिप, न संपणारं हसू, किसेस, एअरपोर्टवरील धावाधाव आणि एकत्र नवीन ठिकाणांवर फिरणं. आयुष्य अचानक माझ्या फेव्हरेट लव्ह स्टोरीसारखं वाटू लागलं.
advertisement
5/7
"एक महिन्यापूर्वी मी माझ्या नवऱ्याशी लग्न केलं. पण त्यासोबत मला माझा बेस्ट ट्रॅव्हल पार्टनर, बिगेस्ट चीअरलीडर आणि आवडता माणूस सापडला.  अजूनही खरं वाटत नाही आहे. पण जर वैवाहिक आयुष्य असं असेल तर मी आयुष्यभर या मॅडनेससाठी तयार आहे.  खूप प्रेम मिळतंय, नशीबवान आहे. मिसेस अपूर्वा तनुज गोवाळकर असल्याचा अभिमान वाटतो आहे", असं अपूर्वा म्हणाली.
advertisement
6/7
अपूर्वाचं तनुजबरोबरचं लग्न हे तिचं दुसरं लग्न केलं आहे. काही वर्षांआधी अपूर्वाचं लग्न झालं होतं मात्र काही कारणांनी तिचा डिवोर्स झाला. घटस्फोटानंतर 8 वर्षांनी अपूर्वाने तिच्या प्रेमाला दुसरा चान्स देत तनुजबरोबर नवा संसार सुरू केला आहे.
advertisement
7/7
अपूर्वाने तिच्या लग्नाबाबत कुठेच भाष्य केलं नव्हतं. व्हॅलेंटाईन डेला तिनं अत्यंत मोजक्या माणसांमध्ये लग्न केलं आणि सोशल मीडियावर थेट फोटो शेअर करत चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. पुन्हा लग्नाचा निर्णय घेतल्याचं पाहून चाहत्यांनी देखील तिचं कौतुक करत तिच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
विश्वासच बसत नाहीये, आयुष्य अचानक...! लग्नाच्या एक महिन्यातच अपूर्वासोबत हे काय घडलं? सोशल मीडियावर तिनेच सगळं सांगितलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल