प्लेबॅक सिंगिंग सोडल्यानंतर अरिजीत सिंगची राजकारणात एन्ट्री? ममता बॅनर्जींना तगडी टक्कर, काय आहे प्रकरण?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Arijit Singh Retirement: अरिजीतने गायकी सोडल्यावर तो चित्रपट दिग्दर्शन करणार अशा चर्चा रंगत होत्या, पण आता जी बातमी समोर येतेय ती अधिकच धक्कादायक आहे.
advertisement
1/9

आपल्या आवाजाने संपूर्ण देशाला क्षणात प्रेमात पाडणाऱ्या अरिजीत सिंगने "मी आता चित्रपटांसाठी गाणार नाही" असं सांगून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला होता. पण हा निर्णय मोठ्या गोष्टीची सुरुवात असल्याचं आता दिसतंय.
advertisement
2/9
अरिजीतने गायकी सोडल्यावर तो चित्रपट दिग्दर्शन करणार अशा चर्चा रंगत होत्या, पण आता जी बातमी समोर येतेय ती अधिकच धक्कादायक आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अरिजीत सिंग आता चक्क राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे.
advertisement
3/9
'एनडीटीवी'च्या एका रिपोर्टनुसार, अरिजीत सिंग केवळ एखाद्या पक्षात प्रवेश करणार नाही, तर तो स्वतःची राजकीय पार्टी लाँच करण्याच्या विचारात आहे. मात्र, तो घाईघाईने कोणताही निर्णय घेणार नाही.
advertisement
4/9
२०२६ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तो थेट उतरण्याची शक्यता कमी आहे, पण पडद्यामागून हालचाली वेगाने सुरू आहेत. पश्चिम बंगालच्या राजकीय वर्तुळात या बातमीने मोठी खळबळ उडवून दिली आहे.
advertisement
5/9
अरिजीत आजही आपल्या मूळ गावी म्हणजेच मुर्शिदाबादमधील जियागंज येथे अगदी साधेपणाने राहतो. कोट्यवधींची संपत्ती असूनही सायकलवरून फिरणारा हा कलाकार तिथल्या स्थानिकांचा आवडता आहे.
advertisement
6/9
रिपोर्टनुसार, अरिजीतला थेट मोठ्या पदाची हाव नाही. त्याला पहिल्यांदा स्थानिक पातळीवर काम करून लोकांच्या समस्या सोडवायच्या आहेत. सामाजिक कार्यात तो आधीपासूनच सक्रिय असल्यामुळे, जियागंजमधून तो आपली राजकीय इनिंग सुरू करू शकतो, अशी जोरदार चर्चा आहे.
advertisement
7/9
'तुम ही हो'पासून सुरू झालेला अरिजीतचा प्रवास 'बॉर्डर २' मधील 'घर कब आओगे' आणि विशाल भारद्वाज यांच्या 'ओ रोमियो'मधील शेवटच्या काही गाण्यांपर्यंत येऊन थांबला आहे. गेल्या १० वर्षांत त्याने बॉलिवूडला जे संगीत दिलं, ते विसरणं अशक्य आहे.
advertisement
8/9
पण अरिजीतला आता केवळ मनोरंजनापुरतं मर्यादित राहायचं नाहीये. त्याला समाजकारणात उतरून प्रत्यक्ष बदल घडवायचा आहे, म्हणूनच त्याने आपल्या करिअरच्या शिखरावर असताना प्लेबॅक सिंगिंगला पूर्णविराम दिला आहे.
advertisement
9/9
अरिजीतने अद्याप आपल्या राजकीय प्रवासाबद्दल अधिकृतपणे कोणतंही विधान केलेलं नाही. पण त्याने सोशल मीडियावर ज्या प्रकारे "नवीन काहीतरी शिकायचंय आणि करायचंय" असं म्हटलं होतं, त्याचा संबंध आता या राजकीय हालचालींशी जोडला जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
प्लेबॅक सिंगिंग सोडल्यानंतर अरिजीत सिंगची राजकारणात एन्ट्री? ममता बॅनर्जींना तगडी टक्कर, काय आहे प्रकरण?