TRENDING:

Mukta Barve: 'लग्नसंस्थेत सगळा गोंधळ...', 46 व्या वर्षीही मुक्ता बर्वे सिंगल, कारण सांगत पुरुषांच्या मानसिकतेबद्दल स्पष्टच म्हणाली...

Last Updated:
Mukta Barve about Marriage: ४६ वर्षीही सिंगल असलेल्या मुक्ताने लग्न, रिलेशनशिप आणि एकटेपणा यांसारख्या खासगी विषयांवर अतिशय रोखठोक मत मांडले आहे.
advertisement
1/9
46व्या वर्षी मुक्ता बर्वे सिंगल, पुरुषांच्या मानसिकतेबद्दल स्पष्टच म्हणाली...
मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेली मुक्ता बर्वे नेहमीच आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. सध्या ती 'असंभव' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
advertisement
2/9
चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुक्ता सध्या अनेक मुलाखती देत आहे. अशातच ४६ वर्षीही सिंगल असलेल्या मुक्ताने लग्न, रिलेशनशिप आणि एकटेपणा यांसारख्या खासगी विषयांवर अतिशय रोखठोक मत मांडले आहे.
advertisement
3/9
मुक्ता बर्वेला लग्नाळू मुलांच्या मानसिकतेबद्दल प्रश्न विचारण्यात आला, की यशस्वी आणि जास्त पैसे कमावणारी मुलगी त्यांना नको असते, कारण त्यामुळे घरात स्पर्धा निर्माण होईल असे वाटते, असा अनुभव तुला आला का?
advertisement
4/9
यावर मुक्ताने लगेच उत्तर दिले, "नाही, मी लग्नच नाही केलं. रिलेशनशिपमध्ये अशा समस्या येत नाही. मला असं वाटतं, लग्न संस्थेत आहे तो सगळा गोंधळ आहे, पण आता आहे की नाही मला माहीत नाही."
advertisement
5/9
ती पुढे म्हणाली की, आताची पिढी खूप नवीन गोष्टी शिकत आहे आणि ब्रेक घेत आहे. "एक पार्टनर कमवत असतो, तर दुसरा त्याचा छंद जोपासतो." त्यामुळे रिलेशनशिपमध्ये असताना त्यांना कधीही यशामुळे कोणी दुखावले किंवा समस्या आल्याचा अनुभव आला नाही.
advertisement
6/9
तारुण्यात अनेक तरुण-तरुणी एकटे राहणे पसंत करतात. हा एकटेपणा कधी सुखाचा असतो, तर कधी दुःखाचा; याबद्दल मुक्ताने आपले मत मांडले. मुक्ताने स्पष्ट केले, "मला एकटं राहायला आवडतं. मला माझी कंपनी खूप आवडते. एका वेळेनंतर मला गाडीत ड्रायव्हरही नको वाटतो, इतकं मला एकटं राहायला आवडतं."
advertisement
7/9
ती पुढे म्हणाली, "सतत गप्पा मारत बसणे मला आवडत नाही. मी माझ्या कामात खूप गुंतलेली असते आणि ते करत असताना मला मजा येते." त्यामुळे एकटेपणामुळे तिला कोणताही सकारात्मक किंवा नकारात्मक अनुभव आलेला नाही.
advertisement
8/9
मुक्ता बर्वे ज्या क्षेत्रात काम करते, तिथे सतत लोकांची गर्दी असते आणि प्रत्येकाला व्यक्त व्हायचे असते. त्यामुळे तिला एकटं राहायला मिळणे महत्त्वाचे वाटते. मुक्ता म्हणाली, "मला आवडतं एकटं राहायला, मी ब्रेकही घेते, फिरायलाही जाते."
advertisement
9/9
ती घरात बसून एकामागोमाग सीरिज, सिनेमा पाहत असतात आणि वाचन करतात. "काहीही न करणे हा माझा छंद आहे," असे सांगत तिने आपल्या साधेपणाचे रहस्य उघड केले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Mukta Barve: 'लग्नसंस्थेत सगळा गोंधळ...', 46 व्या वर्षीही मुक्ता बर्वे सिंगल, कारण सांगत पुरुषांच्या मानसिकतेबद्दल स्पष्टच म्हणाली...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल