OTT Best Psycho Thriller: 8.3 रेटिंगची सायको थ्रिलर, क्षणाक्षणाला वाढत जातो सस्पेन्स, क्लामॅक्स पाहून धडकी भरेल
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
OTT Best Psycho Thriller: हा तामिळ चित्रपट सस्पेन्स व थ्रिलरचा खराखुरा बादशाह मानला जातो. इतकंच नाही, तर हा चित्रपट इतका लोकप्रिय झाला की, त्याचे अनेक भाषांमध्ये रिमेक बनले.
advertisement
1/8

मुंबई: बॉलिवूडमध्ये 'दृश्यम' आणि 'अंधाधुन' यांसारख्या सायकॉ थ्रिलर चित्रपटांनी एक वेगळा प्रेक्षकवर्ग तयार केला. या पठडीतले चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या आता मोठी आहे.
advertisement
2/8
पण आज आम्ही तुम्हाला एका अशा तमिळ चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, ज्याची IMDb रेटिंग (८.३) या दोन्ही चित्रपटांपेक्षा जास्त आहे आणि जो सस्पेन्स व थ्रिलरचा खराखुरा बादशाह मानला जातो. इतकंच नाही, तर हा चित्रपट इतका लोकप्रिय झाला की, त्याचे अनेक भाषांमध्ये रिमेक बनले.
advertisement
3/8
हा चित्रपट एक असा सायकॉ थ्रिलर आहे, ज्यात सीरिअल किलरला पकडण्यासाठी हिरो आपले सर्वस्व पणाला लावतो, पण क्लायमॅक्सपर्यंत तो विलनला पकडू शकत नाही. हा चित्रपट ट्विस्ट्स आणि सस्पेन्सने भरलेला आहे. हा एक असा सायकॉ थ्रिलर आहे, जो प्रेक्षकांना धडकी भरवतो.
advertisement
4/8
२०१८ मध्ये आलेल्या या चित्रपटाची कथा एका १५ वर्षांच्या मुलीच्या मृतदेहापासून सुरू होते, जो दोन वृद्ध व्यक्तींना सापडतो. दुसरीकडे, अरुण कुमार नावाचा एक तरुण असतो, जो सायकॉ पॅथ चित्रपटांचा चाहता आहे आणि त्याला तशाच फिल्म्स बनवायच्या आहेत.
advertisement
5/8
कौटुंबिक दबावामुळे अरुण कुमार सब-इन्स्पेक्टर बनतो आणि त्याची पोस्टिंग दुसऱ्या शहरात होते. तिथे तो एका अपहरण प्रकरणाची चौकशी सुरू करतो. तपासादरम्यान अरुणला अडखळत बोलणाऱ्या एका मुलीशी संबंधित घटनांचा सुगावा लागतो. त्याला एक ऍनाबेल टाइपची बाहुली मिळते.
advertisement
6/8
अरुण आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या सीरियल मर्डरबद्दल सांगतो, पण कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. पण अपहरण झालेल्या मुलीचा मृतदेह मिळताच, अरुणचा संशय पक्का होतो. अनेकदा नियमांचे उल्लंघन आणि वरिष्ठांचे आदेश न मानल्यामुळे अरुणला निलंबित केले जाते. निलंबन झाल्यावरही तो खुन्याचा पाठलाग सोडत नाही. तो एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला भेटतो, जिथे त्याला एक महत्त्वाचा क्लू मिळतो.
advertisement
7/8
या चित्रपटाचे मूळ नाव 'रत्सासन' आहे. तमिळमध्ये बनलेल्या या चित्रपटात विष्णू विशाल आणि अमाला पॉल यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचा हिंदीमध्ये 'कठपुतली' आणि तेलुगूमध्ये 'रक्षासुडु' नावाचा रिमेक बनवण्यात आला आहे. हिंदी रिमेकमध्ये अक्षय कुमार आणि रकुल प्रीत सिंह यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
advertisement
8/8
चित्रपट जसजसा पुढे जातो, अपहरण आणि खुनाचे सत्र सुरूच राहते. अखेर अरुण विलन क्रिस्टोफरला शोधून त्याला मारतो आणि आपल्या भाचीला वाचवतो. हा थरारक चित्रपट तुम्ही जिओ हॉटस्टार आणि प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
OTT Best Psycho Thriller: 8.3 रेटिंगची सायको थ्रिलर, क्षणाक्षणाला वाढत जातो सस्पेन्स, क्लामॅक्स पाहून धडकी भरेल