TRENDING:

किंग खानला 200 कोटींचा फटका, करिअरची महाडिजास्टर फिल्म, 9 हिरोईनही वाचवू शकल्या नाहीत शाहरुखचं नशीब

Last Updated:
Shah Rukh Khan Disaster Film: शाहरुख खानचा असा एक सिनेमा होता, ज्याच्या अपयशाने त्याला तब्बल चार वर्षांचा मोठा ब्रेक घ्यावा लागला होता. २०० कोटींचे बजेट आणि त्यात ९ टॉप अभिनेत्री असूनही, या चित्रपटाला वाचवू शकल्या नाहीत.
advertisement
1/8
किंग खानची महाडिजास्टर फिल्म, 9 हिरोईनही वाचवू शकल्या नाहीत शाहरुखचं नशीब
मुंबई: बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानने त्याच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट सिनेमे दिले. गेल्या कित्येक वर्षांपासून त्याची क्रेझ कायम आहे. त्यातच, २०२३ हे वर्ष 'पठाण' आणि 'जवान'मुळे त्याच्यासाठी ऐतिहासिक ठरले.
advertisement
2/8
पण प्रत्येक सुपरस्टारच्या आयुष्यात काही कटू आठवणी असतातच. शाहरुख खानचा असा एक सिनेमा होता, ज्याच्या अपयशाने त्याला तब्बल चार वर्षांचा मोठा ब्रेक घ्यावा लागला होता. २०० कोटींचे बजेट आणि त्यात ९ टॉप अभिनेत्री असूनही, या चित्रपटाला वाचवू शकल्या नाहीत.
advertisement
3/8
हा सिनेमा आहे, २०१८ मध्ये आलेला 'झिरो' (Zero). 'कलर्स येलो प्रॉडक्शन' आणि शाहरुखच्याच 'रेड चिलीझ एंटरटेनमेंट'ने मिळून या चित्रपटावर २०० कोटी रुपये खर्च केले होते. शाहरुख खानला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या.
advertisement
4/8
या चित्रपटात शाहरुख खानने ३८ वर्षीय 'बऊआ सिंह' नावाच्या बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारली होती. त्याच्यासोबत कतरिना कैफ (बबिता कुमारी) आणि अनुष्का शर्मा (आफिया) यांनीही मुख्य भूमिका साकारल्या होत्या.
advertisement
5/8
'जब तक है जान' नंतर या तिन्ही कलाकारांनी एकत्र काम करण्याचा हा दुसरा योग होता. हा चित्रपट फ्लॉप होण्यामागे अनेक कारणे असली, तरी एका सीनमुळे हा चित्रपट खूप चर्चेत राहिला होता. हा सीन म्हणजे, 'बऊआ सिंह' तुटणारा तारा सगळ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतो.
advertisement
6/8
याच सीनदरम्यान बॉलिवूडमधील सहा दिग्गज अभिनेत्री एकाच फ्रेममध्ये दिसल्या होत्या. यात जुही चावला, काजोल, राणी मुखर्जी, आलिया भट्ट, करिश्मा कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा समावेश होता. या सहा अभिनेत्रींव्यतिरिक्त, शाहरुखची लकी चार्म मानली जाणारी दीपिका पादुकोण हिचाही या चित्रपटात कॅमिओ होता.
advertisement
7/8
कतरिना आणि अनुष्कासह एकूण ९ टॉप अभिनेत्री या चित्रपटात असूनही, शाहरुखचा तो 'तुटता तारा' कोणालाही दिसला नाही, ज्यामुळे बऊआ सिंहचा खूप अपमान झाला होता. इतकं मोठं बजेट, 'किंग खान'चा सिनेमा आणि नऊ टॉप अभिनेत्रींचा आधार असूनही 'झिरो' चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला.
advertisement
8/8
या चित्रपटाने भारतात केवळ ९७.६० कोटी रुपये इतकाच व्यवसाय केला, ज्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर महाफ्लॉप ठरला. या अपयशामुळेच शाहरुख खानला मोठा ब्रेक घ्यावा लागला होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
किंग खानला 200 कोटींचा फटका, करिअरची महाडिजास्टर फिल्म, 9 हिरोईनही वाचवू शकल्या नाहीत शाहरुखचं नशीब
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल