Amitabh Bachchan: 'तिने खूप काही सहन केलं', ऐश्वर्याची अवस्था पाहून हळहळले होते अमिताभ बच्चन, सांगितली अंगावर काटे आणणारी घटना
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Amitabh Bachchan-Aishwarya Rai: गेल्या वर्षभरापासून बच्चन कुटुंबामध्ये काहीही ठीक नसल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. अशातच अमिताभ बच्चन यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यात ते सून ऐश्वर्या राय बच्चनच्या धाडसाविषयी बोलत आहेत.
advertisement
1/9

मुंबई: गेल्या वर्षभरापासून बच्चन कुटुंबामध्ये काहीही ठीक नसल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यामध्ये काहीतरी बिनसलं असून लवकरच ते एकमेकांपासून वेगळं होणार आहेत असं म्हटलं जात होतं. या सगळ्याला ऐश्वर्या रायची सासू जया बच्चन आणि नणंद श्वेता नंदा यांना कारणीभूत मानलं जात होतं.
advertisement
2/9
अशातच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यात ते सून ऐश्वर्या राय बच्चनच्या धाडसाविषयी बोलत आहेत.
advertisement
3/9
२०११ मध्ये आराध्याच्या जन्मावेळी ऐश्वर्याने घेतलेल्या एका निर्णयामुळे तिची हिंमत पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे, ज्याचे अमिताभ यांनी भरभरून कौतुक केलं आहे.
advertisement
4/9
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी २००७ मध्ये लग्न केले आणि २०११ मध्ये त्यांच्या घरी आराध्याचा जन्म झाला. आराध्या नुकतीच १४ वर्षांची झाली आहे. तिच्या जन्मानंतर लगेचच बच्चन कुटुंबीयांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता, तेव्हा अमिताभ बच्चन यांनी हा मोठा खुलासा केला.
advertisement
5/9
अमिताभ बच्चन यांनी सांगितले होते, "ती सुमारे २ ते ३ तास तीव्र लेबर पेनमध्ये होती, पण तरीही तिने नॉर्मल डिलिव्हरीवरच जोर दिला."
advertisement
6/9
अमिताभ यांनी हे देखील सांगितले की, ऐश्वर्याने कोणत्याही प्रकारच्या पेनकिलर किंवा एपीड्यूरलचा वापर केला नाही. तिने मोठ्या हिंमतीने बाळाला जन्म दिला. ऐश्वर्याच्या या निर्णयामुळे तिची प्रशंसा होत आहे.
advertisement
7/9
२०११ मधील डिलिव्हरीच्या आधीही अमिताभ बच्चन ऐश्वर्याशी संबंधित मुद्द्यांवर नेहमीच ते तिची बाजू मांडताना दिसले आहेत. विशेषतः, २०१० मध्ये एका मुंबईतील वृत्तपत्राने ऐश्वर्या आई बनू शकत नाही, अशी खोटी बातमी छापली होती. ही बातमी वाचून अमिताभ बच्चन खूप नाराज झाले होते.
advertisement
8/9
२०११ मधील डिलिव्हरीच्या आधीही अमिताभ बच्चन ऐश्वर्याशी संबंधित मुद्द्यांवर नेहमीच ते तिची बाजू मांडताना दिसले आहेत. विशेषतः, २०१० मध्ये एका मुंबईतील वृत्तपत्राने ऐश्वर्या आई बनू शकत नाही, अशी खोटी बातमी छापली होती. ही बातमी वाचून अमिताभ बच्चन खूप नाराज झाले होते.
advertisement
9/9
अमिताभ यांनी तेव्हा स्पष्ट केले होते की, "मी माझ्या कुटुंबाचा प्रमुख आहे. ऐश्वर्या माझी सून नाही, तर माझी मुलगी आहे." जर कोणी त्यांच्याबद्दल चुकीचे किंवा अपमानास्पद बोलले, तर ते पूर्ण ताकदीने त्याला उत्तर देतील, असेही त्यांनी ठणकावले होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Amitabh Bachchan: 'तिने खूप काही सहन केलं', ऐश्वर्याची अवस्था पाहून हळहळले होते अमिताभ बच्चन, सांगितली अंगावर काटे आणणारी घटना