TRENDING:

'कसं जमतं, इतकी ताकद कुठून येते?' 60 वर्षांच्या अविनाश नारकरांना जोश पाहून पत्नी ऐश्वर्याही थक्क, त्यांनी असं केलं काय

Last Updated:
Aishwarya And Avinash Narkar : एव्हरग्रीन अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी पती अभिनेते अविनाश नारकर यांच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. अविनाश नारकर यांनी असं काय केलं जे पाहून ऐश्वर्याही थक्क झाल्यात.
advertisement
1/11
60 वर्षांच्या अविनाश नारकरांना जोश पाहून पत्नी ऐश्वर्याही थक्क, असं केलं काय?
मराठी सेलिब्रेटी कपलचा विचार केला तर त्यात अभिनेते अविनाश नारकर आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचं नाव येतंच.
advertisement
2/11
ऐश्वर्या आणि अविनाश हे मराठी इंडस्ट्रीचे एव्हरग्रीन कलाकार आहेत. आजवर त्यांनी मालिका आणि सिनेमांमधून प्रेक्षकांनी मनं जिंकली. ही एव्हरग्रीन जोडी आता नाटकांतूनही प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.
advertisement
3/11
ऐश्वर्या आणि अविनाश सोशल मीडियावरही सक्रीय असतात. त्यांचे रील व्हिडीओ व्हायरल होत असतात. दरम्यान अविनाश नारकर यांनी वयाच्या 60व्या वर्षी असं काही केलं की ते पाहून त्यांची पत्नी ऐश्वर्या नारकरही थक्क झाली.
advertisement
4/11
ऐश्वर्या आणि अविनाश हे सध्या शेवग्याच्या शेंगा या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ऐश्वर्या यांनी याच नाटकातील दोघांचे फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे.
advertisement
5/11
त्यांनी पोस्टमध्ये लिहिलंय, "प्रिय अवि, तू माझं इन्स्पिरेशन आहेस. मी रोज काहीतरी तुझ्याकडून नवीन शिकत आलेय. तुझं तुझ्या कामावर असलेलं प्रेम, जगण्यातली, काम करण्यातली जिद्द, सतत हसरा चेहरा ह्या सगळ्यातच तुझ्या जगण्याचं रसायन दडलेलं आहे."
advertisement
6/11
"गेले काही दिवस तुला पुरेसा आराम मिळत नाहिये. खूप धावपळ होतेय. तरी देखील तू तेवढ्याच जिद्दीने काम करतोयस. दोन मालिका आणि दोन नाटकं करतोयस पण तुला दिवसाअखेरी कधीच थकलेलं बघितलं नाही मी."
advertisement
7/11
ऐश्वर्या यांनी एक प्रसंग सांगितला. त्यांनी लिहिलंय, "27 सप्टेंबरला आपल्या शेवग्याच्या शेंगा नाटकाचा शुभारंभ पुण्यात पार पडला. त्या दिवशी तू सलग तीन प्रयोग न थकता आणि फुल एनर्जीने केलेस. आणि शेवटच्या प्रयोगानंतर प्रेक्षकांशी भेटताना तेव्हढ्याच हसतमुख चेहऱ्याने भेटलास."
advertisement
8/11
"अगदी परवा सुद्धा पुण्यातला दुपारी 12.15 चा आपला शेवग्याच्या शेंगाचा प्रयोग करून मुंबईला प्रवास आणि रात्री 8.30 वाजताचा पुरुष नाटकाचा प्रयोग केलास!"
advertisement
9/11
[caption id="attachment_1506398" align="aligncenter" width="750"] ऐश्वर्या यांनी पुढे लिहिलंय, "रात्री उशिरा घरी येऊन पुन्हा शूटसाठी पहाटे घर सोडलंस आणि नंतर दादरला आपला शेवग्याच्या शेंगाचा प्रयोग होता. कसं जमतं रे तुला? इतकी ताकद कुठून येते तुझ्यात?"</dd> <dd>[/caption]
advertisement
10/11
"सहकलाकर म्हणून काम करताना तुझा अभिमान वाटतोच पण तुझी बायको असण्याचा अभिमान त्याही पेक्षा जास्त आहे. तुझे कष्ट, तुझी जिद्द, तुझं प्रेम, तुझी स्वप्नं इतक्या जवळून मला अनुभवता येतंय या पेक्षा अजून काय हवं आयुष्यात?"
advertisement
11/11
ऐश्वर्या यांनी पोस्टच्या शेवटी लिहिलंय, "खरंच मला तुझा खूप अभिमान वाटतो. तू ज्या ताकदीने काम करतोयस मलाही त्याच ताकदीने काम करता येऊदे. खूप खूप प्रेम. तुझी पल्लू"
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'कसं जमतं, इतकी ताकद कुठून येते?' 60 वर्षांच्या अविनाश नारकरांना जोश पाहून पत्नी ऐश्वर्याही थक्क, त्यांनी असं केलं काय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल