TRENDING:

BB19 Winner: फराह खानने सांगून टाकलं Bigg Boss 19 च्या विजेत्याचं नाव, गेल्या वर्षीही खरी ठरली होती भविष्यवाणी

Last Updated:
Bigg Boss 19 Winner Prediction: नुकताच फराह खानला 'बिग बॉस १९'चा विजेता कोण असेल, असा थेट प्रश्न विचारण्यात आला, ज्यावर फराहने कोणताही आडपडदा न ठेवता आपल्या आवडत्या स्पर्धकाचे नाव सांगितले आणि तोच जिंकेल असा विश्वास व्यक्त केला.
advertisement
1/8
फराह खानने सांगून टाकलं Bigg Boss 19 च्या विजेत्याचं नाव, कोण आहे तो?
मुंबई: बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खान 'बिग बॉस' च्या अनेक सीझनमध्ये 'वीकेंड का वार' होस्ट करण्यासाठी जाते. त्यामुळे या शोसोबत तिचे खास कनेक्शन आहे.
advertisement
2/8
नुकताच सोहा अली खानच्या पॉडकास्टमध्ये फराह खानला 'बिग बॉस १९'चा विजेता कोण असेल, असा थेट प्रश्न विचारण्यात आला, ज्यावर फराहने कोणताही आडपडदा न ठेवता आपल्या आवडत्या स्पर्धकाचे नाव सांगितले आणि तोच जिंकेल असा विश्वास व्यक्त केला.
advertisement
3/8
सोहा अली खानने प्रश्न विचारताच फराह खान म्हणाली की, तिला याबद्दल बोलायची परवानगी आहे की नाही, हे माहीत नाही, पण ती 'बिग बॉस'च्या खूप जवळ असल्याने तिने आपले मत मांडले.
advertisement
4/8
फराह खानने थेटपणे अभिनेता गौरव खन्ना याचे नाव घेतले आणि तोच हा सीझन जिंकेल असा अंदाज वर्तवला. फराह म्हणाली, "गेल्या वर्षी जेव्हा मी घरात गेले होते, तेव्हा मी सांगितले होते की हा शो करणवीर मेहराचा आहे आणि त्याने शो जिंकला होता."
advertisement
5/8
फराह खानसोबतच अनेक सेलिब्रिटींनी आणि इतर स्पर्धकांच्या कुटुंबियांनीही गौरव खन्नाच्या खेळाचे कौतुक केले आहे. घरात फराहची आई, अशनूरचे वडील आणि कुनिकाचा मुलगा यांनी गौरवच्या खेळाचे भरभरून कौतुक केले.
advertisement
6/8
सुरुवातीला गौरव फारसा दिसला नसला तरी, आता शेवटच्या काही आठवड्यांत तो फ्रंट फुटवर येण्याची शक्यता आहे. फराह खानने दिलेली ही भविष्यवाणी खरी ठरते का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
advertisement
7/8
फराह खान म्हणाली, "यावेळी मला वाटतेय की, हा शो गौरव खन्नाचा बनत चालला आहे. कारण प्रत्येकजण त्याच्याविरुद्ध गँग बनवत आहे. तो या सर्व गोष्टींचा खूप चांगल्या प्रकारे सामना करत आहे. तो सन्मानाने खेळतोय, शिवीगाळ करत नाहीये आणि खूप चांगला खेळ खेळत आहे."
advertisement
8/8
गौरव खन्ना टीव्हीचा चेहरा असल्यानेही मोठा फायदा होत आहे. तो स्टार प्लसच्या लोकप्रिय शो 'अनुपमा' चा महत्त्वाचा भाग राहिला आहे, ज्यामुळे तो घरोघरी पोहोचला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
BB19 Winner: फराह खानने सांगून टाकलं Bigg Boss 19 च्या विजेत्याचं नाव, गेल्या वर्षीही खरी ठरली होती भविष्यवाणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल