सुनेने बॉयफ्रेंडच्या मदतीने केला सासूचा खून, अंध सासऱ्याने घेतला भयंकर बदला, रक्तरंजित क्राइम थ्रिलर पाहून उडेल थरकाप
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Best Crime Thriller Film On OTT: एकाच घरात, एका रात्रीत घडलेल्या भयंकर हत्येचा आणि त्यानंतर सुरू झालेल्या रक्तरंजित सूडाचा हा चित्रपट आहे.
advertisement
1/7

मुंबई: जर तुम्ही ओटीटीवर थरार आणि जबरदस्त क्राईम थ्रिलर शोधत असाल, तर हा चित्रपट तुमच्यासाठीच आहे! एकाच घरात, एका रात्रीत घडलेल्या भयंकर हत्येचा आणि त्यानंतर सुरू झालेल्या रक्तरंजित सूडाचा हा चित्रपट आहे.
advertisement
2/7
ही कथा एका सुनेची आहे, जी प्रियकराच्या मदतीने आपल्या सासूची हत्या करते, पण तिचा आंधळा आणि बहिरा असलेला सासरा तिला अशी धडकी भरवणारी शिक्षा देतो की, क्लायमॅक्स पाहून तुम्ही हादरून जाल.
advertisement
3/7
'उडल' (Udal) हा मल्याळम चित्रपट सध्या ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे. रथीश रघुनंदन दिग्दर्शित या चित्रपटाची कथा तीन पात्रांभोवती फिरते. सासूची सेवा करून थकलेली सून दुर्गा कृष्णा, अंथरुणावर पडून असलेली सासू, बघू-ऐकू न शकणारा वृद्ध सासरा इंद्रन्स. त्रासाला कंटाळून सून आपल्या प्रियकराच्या मदतीने सासूची हत्या करते.
advertisement
4/7
पहिल्या भागातमध्ये ही हत्या कशी घडते हे दाखवले आहे, पण दुसरा भाग पूर्णपणे सूडावर आधारित आहे. चित्रपटाचा इंटरव्हल इतका जबरदस्त आहे की, तो प्रेक्षकांना सीटवर खिळवून ठेवतो. हा हॉरर चित्रपट नसला तरी, यात हॉरर चित्रपटांतील थरार नक्कीच जाणवतो.
advertisement
5/7
दुसऱ्या हाल्फची सुरुवात होताच प्रेक्षक अक्षरशः जागे खिळून राहतात. जो सासरा डोळ्यांनी पाहू शकत नाही आणि कानांनी ऐकू शकत नाही, तो सुनेकडून तिच्या गुन्ह्याचा बदला कसा घेतो, ही कहाणी दुसऱ्या भागात रोमांचक पद्धतीने मांडली आहे.
advertisement
6/7
चित्रपटाचे बॅकग्राउंड म्युझिक आणि कॅमेरा वर्क भयानक थरार निर्माण करतात. दुसऱ्या हाफमधील बहुतेक चित्रीकरण अंधारात केले आहे, ज्यामुळे वातावरणातील भीती अधिक प्रभावी होते. हा भयानक क्राईम-थ्रिलर चित्रपट ॲमेझॉन प्राइम ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
advertisement
7/7
'उडल' चित्रपट एकाच बैठकीत पाहण्यासारखा आहे, पण यात हिंसेचे सीन जास्त असल्यामुळे हा चित्रपट केवळ १८+ वयोगटातील प्रेक्षकांसाठी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सुनेने बॉयफ्रेंडच्या मदतीने केला सासूचा खून, अंध सासऱ्याने घेतला भयंकर बदला, रक्तरंजित क्राइम थ्रिलर पाहून उडेल थरकाप