Sarang Sathaye - Paula : पुण्याच्या सारंग साठ्येला कुठे भेटली फॉरेनची पॉला! 12 वर्षांआधी अशी सुरू झाली LOVE STORY
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Sarang Sathaye - Paula Love Story : अभिनेता सारंग साठ्ये आणि पॉला यांनी नुकतंच लग्न केलं. 12 वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांची लव्ह स्टोरी माहितीये का?
advertisement
1/13

भाडिपा फेम आणि उत्तम मराठी अभिनेता सारंग साठ्येनं नुकतंच त्याची लाँग टर्म गर्लफ्रेंड पॉला मॅकग्लिन हिच्याशी लग्न केलं. पॉला आणि सारंग गेली 12 वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.
advertisement
2/13
दोघांनी मिळून भाडिपाची सुरूवात केली. एक अभिनेता ते सोशल मीडियावर क्रिएटर म्हणून सारंगची ओळख आहे.
advertisement
3/13
या प्रवासात पॉला त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. अखेर 12 वर्षांच्या रिलेशननंतर दोघांनी थेट कॅनडात जाऊन लग्न केलं.
advertisement
4/13
एकीकडे अस्सल पुणेरी मराठमोळा सारंग साठ्ये तर दुसरीकडे कॅनडाची पॉला मॅकग्लिन. ही दोन्ही समीकरण बघायला गेली तरी फार विरुद्ध पण प्रेमापुढे सगळंच व्यर्थ.
advertisement
5/13
पुण्याच्या मराठमोळ्या सारंगला ही कॅनेडियन पोरगी कशी काय पटली? दोघांची पहिली भेट कुठे झाली?
advertisement
6/13
सारंग आणि पॉला यांनी याआधी अनेकदा एकत्र मुलाखती दिल्या आहेत. तेव्हा दोघेही त्यांच्या नात्याबद्दल भरभरून बोलले आहेत.
advertisement
7/13
दोघांची पहिली भेट 2012 मध्ये टोरँटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाली होती. तिथल्या पार्टीमध्ये दोघे पहिल्यांदा भेटले.
advertisement
8/13
सारंग तिथे एका फिल्मसाठी गेला होता. पॉल देखील तिच्या पहिल्या शॉर्ट फिल्मसाठी तिथे आली होती. पार्टीत मोजून 2-3 मिनिटं त्यांचं बोलणं झालं.
advertisement
9/13
या भेटीनंतर एक वर्षांनी सारंग आणि पॉला यांची भेट पुण्यात आली होती. सारंग एका फिल्मसाठी कास्टिंग करत होता तिथे पॉला अस्टिस्टं डायरेक्टर म्हणून काम करणार होती.
advertisement
10/13
त्याआधी पॉला दोन वेळा स्कॉलरशीप, कॉलेजच्या निमित्तानं भारतात आली होती. त्यावेळेस ती तिसऱ्यांदा भारतात आलेली आणि दोघांची भेट झाली.
advertisement
11/13
सारंगने त्यांच्या भेटीचा किस्सा एका मुलाखतीत सांगितला होता. तो म्हणाला होता, "माझा डायरेक्टर मला म्हणाला की, माझी असिस्टंड डायरेक्टर येत आहे. तू मुंबईत आहेस तर तिला जाऊन पिकअप कर."
advertisement
12/13
"मी तिला पिकअप करायला गेलो आणि ती पॉला होती. आम्ही त्या दिवशी पुन्हा भेटलो. तेव्हापासून आमच्या गप्पा चालू झाल्या आणि आजपर्यंत सुरू आहेत."
advertisement
13/13
सारंग आणि पॉला यांनी कॅनडाच्या डिप कोव्ह या ठिकाणी लग्न केलं. त्यांच्या लग्नाला त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Sarang Sathaye - Paula : पुण्याच्या सारंग साठ्येला कुठे भेटली फॉरेनची पॉला! 12 वर्षांआधी अशी सुरू झाली LOVE STORY