सोलापूर - मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. ऐन सणासुदीच्या काळात तोंडावर हाताशी आलेले पीक पाण्याखाली गेले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी गावात राहणारे शेतकरी तात्यासाहेब गायकवाड यांनी कांदा, भोपळा आणि द्राक्षाची लागवड करण्यासाठी जवळपास 13 लाख रुपये खर्च आला होता.पण या पावसामुळे आणि भीमा नदीला आलेल्या पुरामुळे संपूर्ण पिकाचे नुकसान झाले आहे. तर शेतीसाठी घेतलेला लोन कसं फेडायचं हा प्रश्न आता गायकवाड यांना पडला आहे.