TRENDING:

'भिकारीण ठेवून गेली, म्हशीने नाकावर पाय दिला'; मराठी अभिनेत्रीनं सांगितला बालपणीचा शॉकिंग किस्सा

Last Updated:
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनं तिच्या बालपणीचा एक शॉकिंग किस्सा सांगितला. बालपणी मामा आणि आजीच्या त्या मस्करीमुळे ती चिंतेत पडली होती.
advertisement
1/8
'भिकारीण ठेवून गेली, म्हशीने नाकावर पाय दिला', अभिनेत्रीचा धक्कादायक किस्सा
लहान मुलांची मस्करी करण्यासाठी अनेकदा त्यांचा त्यावर विश्वास बसतो. तुला कचऱ्यातून उचलून आणलंय, तू रस्त्यावरून आणलंय हे तर अनेक मुलांना सर्रास बोललं जातं. अभिनेत्रीसोबतही असंच झालं होतं. या गोष्टीचा तिला अनेक वर्ष त्रास सहन करावा लागला.
advertisement
2/8
मराठीसह हिंदी मालिका आणि सिनेमांमध्ये काम करणारी अभिनेत्री स्वाती चिटणीस यांनी आरपारला दिलेल्या मुलाखतीत हा किस्सा सांगितला.
advertisement
3/8
स्वाती चिटणीस म्हणाल्या, "लहानपणापासून मला माझ्या दिसण्याबद्दल कॉम्प्लेक्स होता. माझ्या घरी सगळे गोरे होते. मीझी आई गोरी, माझे वडील गोरे आणि मी एकटीच काळी."
advertisement
4/8
"माझा मामा मला चिडवायचा की तू लगान असताना एका म्हशीने तुझ्या नाकावर पाय दिला होता. माझ्या आईच्या आईने मला सांगितलेलं की, एक भिकारीण आली होती तिने तुला आमच्याकडे दिलं."
advertisement
5/8
"हिला घ्या आणि एक भाकरी द्या, असं की म्हणाली. मग तुझ्या आईने तुला ठेवून घेतली. म्हणून बघ तू किती वेगळी आहेस. तू कशी काळी आहे आणि तुझी मम्मी कशी गौरी आहे."
advertisement
6/8
स्वाती चिटणीस यांनी पुढे सांगितलं की, "मी तेव्हा तीन साडेतीन वर्षांची असेन. माझी आई नोकरी करायची. आई शाळेतून आली आणि मी तिला विचारलं की आई गं माझी खरी मम्मा कोण आहे, कुठे असेल?"
advertisement
7/8
"माझी आई म्हणाली, खरी मम्मा म्हणजे काय? मी म्हटलं, जी भिकारीण मला ठेवून गेली ती कुठे असेल? हे एकूण माझ्या आईला धक्का बसला. तुला हे कोणी सांगितलं? मी म्हटलं मला माईने सांगितलं."
advertisement
8/8
"माझी आई नंतर माईला जाऊन खूप ओरडली होती. माई म्हणाली मी गमंत केली होती तिची, ते खरं थोडी आहे. पण मी ते सिरियसली घेतलं. त्यामुळे आजही मला कोणी म्हटलं की तू छान दिसतेस, तर मला ऑकवड होतं", असंही स्वाती यांनी सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'भिकारीण ठेवून गेली, म्हशीने नाकावर पाय दिला'; मराठी अभिनेत्रीनं सांगितला बालपणीचा शॉकिंग किस्सा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल