आधी मालिका मग अफेअर्सच्या चर्चा, आता जुई गडकरीसोबत पुन्हा दिसणार हा अभिनेता
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Jui Gadkari : 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्री जुई गडकरी एका अभिनेत्याबरोबर पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार आहे. या अभिनेत्याबरोबर तिनं याआधी एका मालिकेत काम केलं होतं.
advertisement
1/8

ठरलं तर मग या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी प्रसिद्ध अभिनेत्री जुई गडकरी लवकरच एका नव्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
advertisement
2/8
यावेळी जुईबरोबर एक जुना अभिनेता दिसणार आहे. दोघांनी याआधी एका मालिकेत एकत्र काम केलं होतं.
advertisement
3/8
या मालिकेनंतर दोघांच्या अफेअर्सच्याही चर्चा रंगल्या होत्या. पण जुईने मात्र दोघेही चांगले मित्र असल्याचं सांगितलं होत. दरम्यान अनेक वर्षांनी जुई त्या अभिनेत्यासोबत दिसणार आहे.
advertisement
4/8
[caption id="attachment_1475490" align="aligncenter" width="1080"] जुई गडकरीनं काही दिवसांआधीच तिच्या नव्या इनिंगची घोषणा केली. ती लेखिका म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.</dd> <dd>[/caption]
advertisement
5/8
घटस्थापनेच्या मुहूर्तावर 'कॉकटेल स्टुडिओज' या वेब सीरिजची घोषणा केली. लवकरच लेखिका म्हणून एक नवी सुरुवात असं कॅप्शन देत तिने पोस्ट शेअर केली होती.
advertisement
6/8
या सीरिजमध्ये जुईसोबत अभिनेता प्रसाद लिमये दिसणार आहे. जुई आणि प्रसाद यांनी पुढचं पाऊल या मालिकेत एकत्र काम केलं होतं.
advertisement
7/8
काही वर्षांआधी दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. बिग बॉसच्या घरात जुई प्रसादबद्दल खूप बोलली होती.
advertisement
8/8
जुई आणि प्रसाद यांनी ते एकमेकांना डेट करतात की नाहीवर आजवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण जुईने प्रसाद माझा खूप चांगला मित्र असल्याचं अनेकदा मुलाखतींमध्ये सांगितलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
आधी मालिका मग अफेअर्सच्या चर्चा, आता जुई गडकरीसोबत पुन्हा दिसणार हा अभिनेता