दीपिका पादुकोणसोबत भांडण, फराह खान संतापली; एकमेकांना केलं अनफॉलो? अखेर खरं कारण समोर आलंच
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Farah Khan Deepika Padukone Controversy : बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेत्रीची जोडी फराह खान आणि दीपिका पदुकोणने इन्स्टाग्रामवर एकमेकींना अनफॉलो केलं आहे. त्यांच्यात नेमकं काय बिनसलं आहे, या मागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
advertisement
1/13

मुंबई: बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटी वाद आणि मतभेद नवीन नाहीत. पण, जेव्हा गुरु आणि शिष्यामध्येच बिनसतं, तेव्हा मात्र त्याची जोरदार चर्चा होते. सध्या याच कारणामुळे दिग्दर्शिका फराह खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण या दोघी चर्चेत आल्या आहेत.
advertisement
2/13
फराह आणि दीपिकाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एकमेकींना अनफॉलो केलं आहे, ज्यामुळे त्यांच्यात ‘कोल्ड वॉर’ सुरू असल्याची चर्चा रंगली आहे.
advertisement
3/13
दीपिका आणि फराह खानचं नातं खूप जुनं आहे. २००७ मध्ये फराहच्या ‘ओम शांती ओम’ मधूनच दीपिकाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. नंतर त्यांनी ‘हॅपी न्यू इयर’ मध्येही एकत्र काम केलं. पण, आता या नात्यात मोठी कटुता आल्याचं दिसून येत आहे.
advertisement
4/13
या मतभेदाचं मुख्य कारण दीपिकाची ‘८ तासांची शिफ्ट’ असावी, असा अंदाज नेटकरी लावत आहेत. फराह खानने तिच्या यूट्यूब व्लॉग्समध्ये दीपिकाच्या या अटीवर अनेकदा टोमणे मारले आहेत.
advertisement
5/13
एका व्लॉगमध्ये तिने अभिनेत्री राधिका मदनला ‘तू पण ८ तासांची व्यक्ती आहेस का?’ असं गंमतीत विचारलं होतं आणि या नियमाला आपला पाठिंबा नसल्याचं सांगितलं होतं.
advertisement
6/13
दुसऱ्या एका व्लॉगमध्ये तिने दीपिकावर निशाणा साधत म्हटलं होतं की, “ती आता फक्त आठ तास काम करते आणि तिच्याकडे आमच्या शोसाठी वेळ नाहीये.”
advertisement
7/13
फराहच्या या वारंवारच्या टोमण्यांमुळे दीपिका नाराज झाली असावी आणि म्हणूनच तिने फराहला अनफॉलो केल्याची शक्यता आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, फराहने दीपिकाचा पती रणवीर सिंहलाही अनफॉलो केलं आहे, मात्र रणवीरने अजूनही फराहला अनफॉलो केलेलं नाही.
advertisement
8/13
दीपिका सध्या तिच्या कामाच्या अटींबाबत खूप स्पष्ट आहे. तिने संदीप रेड्डी वांगाच्या ‘स्पिरिट’ आणि ‘कल्की २’ मधूनही अशाच ८ तासांच्या शिफ्टच्या, ओव्हरटाईमसाठी अतिरिक्त फी आणि मानधनात वाढ करण्याच्या मागण्यांसाठी माघार घेतल्याची चर्चा आहे.
advertisement
9/13
अशातच, फराह खानने ‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत या सर्व अफवा आणि वादावर स्पष्टीकरण देत ही फेक कंट्रोव्हर्सी असल्याचं सांगितलं. फराह खानने स्पष्ट केलं की, “मी आणि दीपिका पहिल्यापासूनच इन्स्टाग्रामवर एकमेकींना फॉलो करत नाही.”
advertisement
10/13
‘हॅपी न्यू इयर’ चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळीच दोघांनी हा निर्णय घेतला होता की, सोशल मीडियाऐवजी थेट फोन किंवा मेसेजने संवाद साधायचा. “आम्ही दोघी इन्स्टावर वाढदिवसाच्या शुभेच्छाही देत नाही, कारण दीपिकाला हे सगळं आवडत नाही,” असंही फराहने सांगितलं.
advertisement
11/13
दीपिकाच्या८ तासांच्या शिफ्ट मागणीवरून फराहने मारलेल्या कथित टोमण्याबद्दलही तिने खुलासा केला. फराह म्हणाली, “जी गोष्ट मी ८ तासांच्या शिफ्टबद्दल बोलले होते, तो टोमणा दीपिकासाठी नव्हताच! तो माझ्या टीममधील दिलीपसाठी होता. तो खरंच फक्त २ तास काम करतो, म्हणून मी त्याला ८ तास काम करायला सांगत होते.”
advertisement
12/13
फराहने पुढे सांगितलं की, सगळं काही सोशल मीडियासाठी किंवा पापाराझींसाठी करायचं नसतं. “हे कुणाला माहीत नसेल, पण दीपिकाच्या मुलीच्या जन्मानंतर तिला भेटायला जाणारी मी पहिल्या काही निवडक लोकांपैकी एक होते.”
advertisement
13/13
फराहने अशा खोट्या ट्रेंडवर संताप व्यक्त करत म्हटलं की, “या फेक कंट्रोव्हर्सीजचा ट्रेंड थांबला पाहिजे.” अशा गोष्टींमुळे दोन व्यक्तींमध्ये खरंच समस्या निर्माण होऊ शकतात. “गेल्या आठवड्यात माझ्याबद्दल आणि करण जोहरबद्दल आयुष शर्माला रेड कार्पेटवर इग्नोर केल्याची बातमी आली, पण आम्ही वरती जाण्यापूर्वी खाली भेटलो होतो. अशी खोटी माहिती पसरवणं बंद करायला हवं,” असं आवाहन तिने केलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
दीपिका पादुकोणसोबत भांडण, फराह खान संतापली; एकमेकांना केलं अनफॉलो? अखेर खरं कारण समोर आलंच