TRENDING:

Bharti Singh: वॉटर बॅग फुटली, बेडशीट ओल्या झाल्या... डिलिव्हरीच्या भल्या पहाटे भारतीसोबत घडलेली भयानक घटना

Last Updated:
Bharti Singh Delivery: आई झाल्यानंतर काही तासांतच भारतीने तिच्या यूट्यूब चॅनेलवर एक इमोशनल व्लॉग शेअर केला, ज्यामध्ये तिने डिलिव्हरीच्या त्या भयानक रात्रीचा किस्सा सांगितला आहे.
advertisement
1/10
डिलिव्हरीच्या भल्या पहाटे भारतीसोबत घडलेली भयानक घटना
मुंबई: टीव्ही विश्वातील लाफ्टर क्वीन भारती सिंग दुसऱ्यांदा आई झाली आहे. १९ डिसेंबर २०२५ रोजी ३८ व्या वर्षी भारतीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. मोठा मुलगा गोला आता तीन वर्षांचा झाला असतानाच, लिंबाचिया कुटुंबात पुन्हा एकदा लहानग्या पाहुण्याचं आगमन झाले आहे.
advertisement
2/10
पण हा आनंद मिळण्याआधीचा काही वेळ भारतीसाठी प्रचंड भीतीदायक आणि थरारक होता. आई झाल्यानंतर काही तासांतच भारतीने तिच्या यूट्यूब चॅनेलवर एक इमोशनल व्लॉग शेअर केला, ज्यामध्ये तिने डिलिव्हरीच्या त्या भयानक रात्रीचा किस्सा सांगितला आहे.
advertisement
3/10
सुरुवातीला अशा चर्चा होत्या की 'लाफ्टर शेफ्स'च्या शूटिंगदरम्यान भारतीला कळा सोसाव्या लागल्या. मात्र, भारतीने व्लॉगमध्ये हा खुलासा केला की, हा सगळा प्रसंग तिच्या मुंबईतील राहत्या घरी घडला.
advertisement
4/10
भारती सांगते, "सकाळचे ६ वाजले होते आणि अचानक मला सगळं ओलं झाल्यासारखं वाटलं. मी डॉक्टरांना फोन केला, तेव्हा त्यांनी सांगितलं की तुझी वॉटर बॅग फुटली आहे आणि तुला तातडीने हॉस्पिटलला यावं लागेल."
advertisement
5/10
भारती पुढे रडत म्हणाली, "मी आदल्या रात्रीच बाळाची बॅग भरून ठेवत होते आणि सकाळी हे असं काही घडेल असं वाटलं नव्हतं. मी प्रचंड घाबरले होते, माझे हात-पाय थरथरत होते. कपडे ओले, बेडशीट ओले आणि आम्हाला तातडीने निघावं लागलं."
advertisement
6/10
हर्ष लिंबाचियाने सांगितलं की, पहिल्या मुलाच्या वेळी भारतीला ८-१० तास लेबर पेन सोसावं लागलं होतं, जे पाहून तो स्वतः हादरला होता. पण यावेळी तसं काही घडलं नाही. सगळं काही अगदी वेगाने आणि व्यवस्थित पार पडलं.
advertisement
7/10
भारतीने आपल्या धाकट्या लेकाचं नाव लाडाने 'काजू' ठेवलं आहे. हॉस्पिटलच्या बेडवरूनच व्लॉगिंग करताना ती म्हणाली, "ऑपरेशन थिएटरमध्येच मला कळलं की मुलगा झालाय. काजू सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे, त्यामुळे मी अजून त्याला भेटले नाहीये."
advertisement
8/10
हर्षने मजेत म्हटलं, "आता तुझ्या आयुष्यात तीन मुलं आहेत. एक बारीक आणि दोन जाडे!"
advertisement
9/10
या आनंदाच्या वातावरणात भारतीने नसबंदीवरून हर्षची फिरकी घेतली. भारतीने सांगितलं की, ऑपरेशननंतर डॉक्टरांनी तिला नसबंदीबद्दल विचारलं होतं, पण तिने नकार दिला. हे ऐकताच हर्ष चक्रावून गेला! तो म्हणाला, "अगं दोन मुलं पुरे झाली ना, मी तुला अजून त्रास देऊ शकत नाही."
advertisement
10/10
यावर भारती हसून म्हणाली, "मी हर्षची नसबंदी करून घेईन, पण स्वतःची नाही! कारण मुलगा झाला तरी मनात कुठेतरी एक मुलगी हवी अशी ओढ आहेच. जर तिसरी मुलगी होणार असेल तर मी पुन्हा प्रयत्न करेन." हर्षने मात्र स्पष्ट केलं की, "दोन मुलं आणि एक पत्नी हेच समीकरण बेस्ट आहे. तिसराही मुलगा झाला तर तू तुझे केस उपटून घेशील!"
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bharti Singh: वॉटर बॅग फुटली, बेडशीट ओल्या झाल्या... डिलिव्हरीच्या भल्या पहाटे भारतीसोबत घडलेली भयानक घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल