भारती सिंहनं केलं दुसऱ्या लेकाचं बारसं, 4 अक्षरी ठेवलंय नाव; घाबरू नका बिनधास्त बघा
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Bharti Singh Son Kaju Name Ceremony : भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या दुसऱ्या मुलाचं नाव ठेवलं. ते मुलाला लाडानं काजू म्हणत होते. अखेर त्यांनी मुलाचं बारसं केलं.
advertisement
1/7

कॉमेडिक्विन भारती सिंह प्रेक्षकांची लाडकी कॉमेडियन आहे. भारतीला 19 डिसेंबर 2025 रोजी दुसरा मुलगा झाला. भारती आणि हर्ष लिंबाचिया यांनी स्वत:चं युट्यूब चॅनेल सुरू केलं आहे. ते डेली व्लॉग शेअर करतात.
advertisement
2/7
त्यांचा दुसरा मुलगा ज्याला ते काजू म्हणतात त्याचे आणि मोठा मुलगा गोलाचे अनेक व्हिडीओ दोघेही शेअर करत असतात. दुसऱ्या मुलाच्या जन्माच्या जवळपास 40 दिवसांनी तिने मुलाचं बारसं केलं आहे.
advertisement
3/7
सध्या बाळांच्या नावांचा एक विचित्र ट्रेंड सुरू आहे. अशातच भारती सिंह तिच्या दुसऱ्या मुलाचं नाव काय ठेवणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. अखेर भारतीनं तिच्या दुसऱ्या मुलाचं नाव ठेवलं आहे.
advertisement
4/7
बारशासाठी हर्ष आणि दोन्ही मुलांनी ट्विनिंग केलं होतं. तर भारती लाल पंजाबी ड्रेसमध्ये दिसली. भारतीने काजूच्या बारशाचे फोटो शेअर केलेत. भारतीने काजूचं नाव यशवीर असं ठेवलं आहे. भारतीच्या मोठ्या मुलगाचं म्हणजेच गोलाचं नाव लक्ष असं आहे. तर दुसऱ्या मुलाचं नाव यशवीर असं ठेवलं.
advertisement
5/7
[caption id="attachment_1604418" align="aligncenter" width="750"] भारती आणि हर्षने त्यांच्या दुसऱ्या मुलाचे नाव जाहीर करताच त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. अनेक कलाकारांनी यशवीर हे नाव आवडल्याचं सांगत त्याला आशीर्वाद दिलेत.</dd> <dd>[/caption]
advertisement
6/7
भारतीच्या पोस्टवर एका चाहत्यानं कमेंट करत म्हटलं, "यशवीर, देव काजूला खूप आनंद आणि चांगले आरोग्य देवो". दुसऱ्यानं लिहिलंय,"लक्ष आणि यशवीर ही सुंदर नावे आहेत, खूप गोड." आणखी एकानं लिहिलंय, "यशवीर हे एक सुंदर नाव आहे. यशवीर आणि तुम्हा सर्वांना खूप प्रेम."
advertisement
7/7
भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांचा मुलगा यशवीर 40 दिवसांचा झाला आहे. दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर दोन आठवड्यांनी भारती कामावर परतली. ती "लाफ्टर शेफ्स फन अनलिमिटेड" च्या तिसऱ्या सीझनच्या लोकेशन शूटिंगमध्ये दिसली. भारतीला 2022 साली पहिलं बाळ म्हणजे गोला हा मुलगा झाला. त्यानंतर 2025 मध्ये तिने दुसऱ्या मुलाला जन्म दिला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
भारती सिंहनं केलं दुसऱ्या लेकाचं बारसं, 4 अक्षरी ठेवलंय नाव; घाबरू नका बिनधास्त बघा