हॉररसोबत सस्पेंसचा तडका, 8.8 रेटिंगची जबरदस्त सीरिज; प्रत्येक सीनमध्ये उडेल काळजाचा थरकाप, अंगावर काटे आणणारा क्लायमॅक्स
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
OTT Best Horror-Thriller Series: नुकतीच ओटीटी प्लॅटफॉर्मवर अशीच एक नवी वेब सीरिज रिलीज झाली आहे, जिने रिलीज होताच प्रेक्षकांना वेड लावले आहे. ही ८ एपिसोड्सची सीरिज तुमच्या मनात कायमची भीती निर्माण करू शकते.
advertisement
1/8

मुंबई: हॉरर आणि थ्रिलर चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या खूप मोठी असते. पण, जेव्हा पडद्यावर दिसणारी भीतीदायक कहाणी वास्तविक घटनेवर आधारित असते, तेव्हा प्रेक्षकांच्या अंगावरचा काटा अधिकच तीक्ष्ण होतो.
advertisement
2/8
नुकतीच ओटीटी प्लॅटफॉर्मवर अशीच एक नवी वेब सीरिज रिलीज झाली आहे, जिने रिलीज होताच प्रेक्षकांना वेड लावले आहे. ही ८ एपिसोड्सची सीरिज तुमच्या मनात कायमची भीती निर्माण करू शकते.
advertisement
3/8
ही कहाणी आहे भारतातील पहिले पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर म्हणजेच गौरव तिवारी यांच्या जीवनावर आधारित! या सीरिजचे नाव आहे 'भय: द गौरव तिवारी मिस्ट्री'. ही सीरिज नुकतीच अमेझॉन एमएक्स प्लेअरवर स्ट्रीम झाली आहे.
advertisement
4/8
सीरिजची कथा एका दिल्लीतील तरुणाभोवती फिरते, ज्याचे पायलट बनण्याचे स्वप्न असते. आपल्या आई-वडिलांचे नाव मोठे करण्यासाठी तो विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी थेट लंडनला जातो. पण, तिथे त्याच्यासोबत अशी काहीतरी घटना घडते की त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलते.
advertisement
5/8
तो पायलटची नोकरी सोडून 'घोस्ट इन्व्हेस्टिगेटर' बनतो. म्हणजे, भूत-प्रेत आणि आत्म्यांशी संवाद साधून त्यांना मुक्ती मिळवून देण्याचे काम तो सुरू करतो.
advertisement
6/8
गौरव तिवारी 'पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर' म्हणून स्वतःची टीम तयार करतो. त्याच्याकडे अनेक भूत प्रकरणे येतात, ज्यात तो यशस्वीपणे लोकांना मदत करतो. पण काही प्रकरणे इतकी गूढ आणि धोकादायक असतात की त्यावर नियंत्रण मिळवणे त्यालाही शक्य होत नाही. अशाच एका रहस्यमय प्रकरणाचा तपास करताना, या धाडसी घोस्ट इन्व्हेस्टिगेटरचा जीव जातो.
advertisement
7/8
ही सीरिज गौरव तिवारीच्या आयुष्यातील थरार आणि संघर्ष यशस्वीपणे पडद्यावर मांडते. ही केवळ हॉरर सीरिज नसून, एका सत्य घटनेवर आधारित असल्यामुळे याचा थरार जास्त काळ मनात घर करून राहतो.
advertisement
8/8
'भय: द गौरव तिवारी मिस्ट्री' या वेब सीरिजच्या जबरदस्त कथेचा अंदाज तिच्या आयएमडीबी रेटिंगवरून लावता येऊ शकतो. या सीरिजला ८.८/१० इतके रेटिंग मिळाले आहे. जर तुम्ही खऱ्या अर्थाने हॉरर थ्रिलरचे चाहते असाल, तर ही वेब सीरिज तुमच्यासाठी मस्ट वॉच आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
हॉररसोबत सस्पेंसचा तडका, 8.8 रेटिंगची जबरदस्त सीरिज; प्रत्येक सीनमध्ये उडेल काळजाचा थरकाप, अंगावर काटे आणणारा क्लायमॅक्स