TRENDING:

'...अन् ते पुन्हा कधीच उठले नाहीत', मृत्यूच्यावेळी राज कपूर यांची झालेली भयानक अवस्था, स्वतः राष्ट्रपतींना मोडावा लागला प्रोटोकॉल

Last Updated:
Raj Kapoor Birth Anniversary: राज कपूर यांच्या शेवटच्या दिवसांची आठवण आजही बॉलिवूडला हळहळायला लावते. त्यांच्या अभिनय, निर्मिती आणि दिग्दर्शनाने भारतीय सिनेमावर एक अमिट छाप सोडली, पण त्यांचा शेवट मात्र खूपच दुर्दैवी ठरला.
advertisement
1/9
मृत्यूच्यावेळी राज कपूर यांची भयानक अवस्था, राष्ट्रपतींना मोडावा लागला प्रोटोकॉल
मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीचे 'ग्रेट शो मॅन' म्हणून ज्यांची ओळख होती, ते महान अभिनेते आणि दिग्दर्शक राज कपूर यांची कथा आजही चाहत्यांच्या डोळ्यांत पाणी आणते. आज १४ डिसेंबर रोजी राज कपूर यांचा १०१ वा वाढदिवस आहे.
advertisement
2/9
राज कपूर यांच्या शेवटच्या दिवसांची आठवण आजही बॉलिवूडला हळहळायला लावते. त्यांच्या अभिनय, निर्मिती आणि दिग्दर्शनाने भारतीय सिनेमावर एक अमिट छाप सोडली, पण त्यांचा शेवट मात्र खूपच दुर्दैवी ठरला.
advertisement
3/9
१९८८ साली राज कपूर यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानासाठी 'दादासाहेब फाळके' पुरस्कार जाहीर झाला होता. हा सर्वोच्च सन्मान स्वीकारण्यासाठी ते २ मे १९८८ रोजी दिल्लीत गेले. त्यांची मुलगी रीमा जैन यांनी एका मुलाखतीत त्या भयंकर दिवसाचा अनुभव सांगितला होता.
advertisement
4/9
रीमा जैन यांनी सांगितलेले, "पापा ३० एप्रिलला मुंबईतून दिल्लीला पोहोचले. पण, त्यांचे विमान दिल्लीत उतरले, तेव्हा बाहेर प्रचंड धुळीचे वादळ सुरू होते. विमानाचा दरवाजा उघडताच, त्या धुळीच्या वाऱ्याने त्यांचे स्वागत केले." राज कपूर यांना दम्याचा त्रास होता. धुळीमुळे त्यांच्या फुफ्फुसांवर खूप ताण आला, ज्यामुळे त्यांची तब्येत अचानक बिघडली.
advertisement
5/9
पुरस्कार सोहळ्यासाठी राज कपूर यांना ऑक्सिजन सिलेंडरसह कार्यक्रमाच्या ठिकाणी यावे लागले. रीमा सांगतात, "पुरस्काराच्या वेळी पापा खूप बेचैन आणि अस्वस्थ होते. यामुळेच त्यांनी आईचा हात खूप घट्ट पकडला होता. त्यांना शांतता मिळत नव्हती."
advertisement
6/9
जेव्हा पुरस्कारासाठी राज कपूर यांचे नाव पुकारण्यात आले, तेव्हा त्यांची तब्येत इतकी ढासळली होती की, ते त्यांच्या जागेवरून उठूच शकले नाहीत!
advertisement
7/9
राज कपूर यांची ही अवस्था पाहून, तत्कालीन राष्ट्रपती रामस्वामी वेंकटरमण यांनी प्रोटोकॉल मोडला. त्यांनी स्टेजवरून खाली उतरून, राज कपूर बसले होते तिथे जाऊन त्यांना 'दादासाहेब फाळके' पुरस्कार प्रदान केला.
advertisement
8/9
हा क्षण भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात भावनिक आणि दुर्दैवी क्षणांपैकी एक ठरला. त्यांची अवस्था पाहून राष्ट्रपतींनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले.
advertisement
9/9
रीमा पुढे म्हणाल्या, "त्यानंतर पापांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आणि त्यांचे शेवटचे दिवस खूप वेदनादायी ठरले." २ जून १९८८ रोजी वयाच्या ६३ व्या वर्षी राज कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला. 'दादासाहेब फाळके' पुरस्कार स्वीकारण्यासाठी दिल्लीला गेलेले ते 'ग्रेट शो मॅन' पुन्हा कधीच आपल्या घरी परतले नाहीत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'...अन् ते पुन्हा कधीच उठले नाहीत', मृत्यूच्यावेळी राज कपूर यांची झालेली भयानक अवस्था, स्वतः राष्ट्रपतींना मोडावा लागला प्रोटोकॉल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल